महायुतीच्या नेत्यांची बैठक, महापालिकेपेक्षाही मोठा विजय जिल्हा परिषदेमध्ये मिळवण्याचा निर्धार
schedule18 Jan 26 person by visibility 113 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘महापालिकेपेक्षाही मोठा विजय जिल्हा परिषदेमध्ये महायुतीला मिळेल. कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रत्येक गावामध्ये, वाड्यावर विकास गंगा पोहोचवण्यासाठी महायुती कटिबद्ध आहे’ असा विश्वास मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीचे नेते मंडळी व प्रमुख पदाधिकाऱ्यांची रविवारी, १८ जानेवारी २०२६ कोल्हापुरात बैठक झाली. या बैठकीत निवडणुकीच्या अनुषंगाने जागा वाटप, संघटन यासंबंधी चर्चा झाली.
मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘शक्य असल्यास जिल्हा परिषदेच्या ६८ जागांवर युती करा. त्याचबरोबर जास्तीत जास्त घटक पक्षांना एकत्र घेऊन आगामी जिल्हा परिषद लढणार आहे. विरोधकांना फायदा होणार नाही याची दक्षता घेतली जाईल. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकरी,युवक,महिला यांच्यासाठी राबवण्यात आलेल्या योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबवण्यात आल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातही महायुतीला चांगला प्रतिसाद मिळेल.’
या प्रसंगी भाजपाचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री हसन मुश्रीफ, खासदार खासदार धैर्यशील माने, धनंजय महाडिक, आमदार विनय कोरे, आमदार राहुल आवाडे, अमल महाडिक, आमदार शिवाजी पाटील, माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार प्रकाश आवाडे, सुरेश हळवणकर, संजय घाटगे, पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री मकरंद देशपांडे, भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, राजवर्धन निंबाळकर, समरजितराजे घाटगे, जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीत कदम, शौमिका महाडिक, प्रा. जयंत पाटील महेश जाधव यांच्यासह महायुतीचे सर्व लोकप्रतिनिधी व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.