Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
स्वातंत्र्यदिनापासून धावणार ई बसेस ! कोल्हापुरात होणार सिमेंटचे रस्ते !! कोल्हापूर जिल्ह्यातील २५१ गावांना ७६ कोटी मंजूरमहापुराच्या उपाययोजनेसंबंधी दोन खासदार, सात आमदारांचे जलसंपदामंत्र्यांना पत्रऋतुराज पाटील यांच्यावर वाढदिवसानिमित शुभेच्छाचा वर्षावगोकुळची निवडणूक महायुती म्हणून लढणार, मंत्री मुश्रीफ आमच्या सोबत असतील - धनंजय महाडिकवडिलांना मिठी मारताच नवीद मुश्रीफ झाले भावूककोल्हापूर महानगर भाजप अध्यक्षपदी विजय जाधवस्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी इंडिया आघाडी सरसावली, नेतेमंडळीची पदाधिकाऱ्यांच्यासोबत संयुक्त बैठक जागतिक स्तरावरील कॅन्सर उपचार आता कोल्हापुरात !णणजझ त

जाहिरात

 

महाडिकांकडून नविद मुश्रीफांचे अभिनंदन, विरोधकांवर निशाणा !

schedule30 May 25 person by visibility 520 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :  गोकुळच्या राजकारणात गेली काही वर्षे गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक आणि सत्ताधारी आघाडीतील संघर्ष जिल्ह्याने पाहिला. अगदी वार्षिक सर्वसाधारण सभेतही त्याचे पडसाद उमटले. दरम्यान गोकुळच्या अध्यक्षपदी नविद मुश्रीफ यांची निवड झाल्यानंतर संचालिका शौमिका महाडिक यांनी त्यांचे अभिनंदन केले. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमल महाडिक यांनीही नूतन अध्यक्ष मुश्रीफ यांचे अभिनंदन केले आहे.  दरम्यान संचालिका शौमिका महाडिक यांनी म्हटले आहे, गोकुळ दूध संघाच्या प्रगतीसाठी चांगलं काम नविद मुश्रीफ यांच्या हातून घडो, याच माझ्या त्यांना सदिच्छा राहतील.’ त्याचवेळी त्यांनी विरोधकांवरही नाव न घेता निशाणा साधला आहे.

 संचालिका महाडिक  यांनी पत्रकांत आहे, ‘अनेकदा आपण पाहिलंय राजकारणामध्ये माणसं कधीकधी इतकी हवेत जातात की, आपल्यापेक्षा वरसुद्धा कोणीतरी बसलेलं आहे हे ठार विसरून जातात. आपल्या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये सुद्धा "मलाच सगळं समजतं.. आणि मी म्हणेल तेच खरं.." अशी एक मग्रूर प्रवृत्ती  अस्तित्वात आहे. या प्रवृत्तीला काही गोष्टींची जाणीव करून देण्याच्या दृष्टीने ही चेअरमन निवड महत्वाची होती, असं मला वाटतं. आणि ते काम चांगल्या पद्धतीने पार पडलेलं आहे त्यामुळे आता त्यावर अधिकच भाष्य करणं योग्य होणार नाही.
     बऱ्याच घडामोडीनंतर अखेर आज नविद मुश्रीफ यांची चेअरमनपदी निवड झालेली आहे. आज राज्याच्या व जिल्ह्याच्या राजकारणामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती म्हणून आम्ही सगळे एकत्र काम करत आहोत. त्यामुळे आपल्या युतीतील एखाद्या सहकाऱ्याची अशा महत्वाच्या पदावर निवड होते, तेव्हा निश्चितच आनंद होतो. ’

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes