महाडिक उद्योग समूहाकडून दुष्काळग्रस्तांसाठी दहा लाखाची मदत
schedule28 Sep 26 person by visibility 55 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वनन प्रतिनिधी, कोल्हापूर : महाडिक उद्योग समूह आणि आमदार अमल महाडिक यांच्याकडून दुष्काळग्रस्तांसाठी दहा लाखाची मदत करण्यात आली. आमदार महाडिक यांनी दहा लाखाचा धनादेश मुख्यमंत्री सहायता कक्षाकडे सुपूर्द केला आहे. ‘समाजातील दानशूर व्यक्ती, संस्थांनी दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात द्यावा. उत्सव, समारंभ साधेपणाने साजरे करत दुष्काळग्रस्तांना सहाय करू या.’असे आवाहन आमदार महाडिक यांनी केली आहे.
‘आमदार अमल महाडिक यांनी हा निधी आमदार फंडातून नव्हे तर वैयक्तिक व महाडिक उद्योग समूहातर्फे दिला आहे. महाडिक उद्योग समूहाने यापूर्वीही नैसर्गिक आपत्तीच्या काळात बाधितांना मदतीचा हात दिला आहे. धनंजय महाडिक युवा शक्तीने यापूर्वी दुष्काळग्रस्त भागात चारा पाठविला होता. दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी सरकार उभे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांनी दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी विविध योजना जाहीर केल्या आहेत.’असे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले. दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील ज्या तालुक्यांचा समावेश नाही, त्यांचाही दुष्काळग्रस्त यादीत समावेश करावा अशी मागणी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आपण व आमदार अमल महाडिक यांनी रविवारी, २७ सप्टेंबर रोजी केली आहे.’असे खासदार महाडिक यांनी सांगितले.