दुष्काळग्रस्त तालुक्याच्या यादीत गडहिंग्लज तालुक्याचा प्राधान्याने समावेश करावा - संग्रामसिंह कुपेकर
schedule28 Sep 26 person by visibility 37 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राज्य सरकारने राज्याभरातील राज्यभरातील एकूण २६५ तालुके दुष्काळग्रस्त जाहीर केली आहेत. खरीप हंगाम २०२६ मधील पर्जन्याची तूट व इतर निकषाच्या आधारे जाहीर केलेल्या यादीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुका वगळला आहे. या दुष्काळग्रस्त तालुक्यांची यादीमध्ये गडहिंग्लज तालुक्याचा समावेश करून येथील जनतेला व शेतकरी वर्गाला दिलासा द्यावा व दुष्काळग्रस्त भागाची पाहणी व शेतीची पंचनामे करून घेण्याचे आदेश देण्यात यावे.’अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य संग्रामसिंह कुपेकर यांनी केली आहे.
त्यांनी, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी विजय राठोड यांना दिले. याप्रसंगी जयसिंगराव चव्हाण, शिवराज देसाई, संदीप शिंदे उपस्थित होते. ‘यंदा गडहिंग्लज तालुक्यात आवश्यकतेपेक्षा कमी व अनियमित पाऊस झाला आहे. पिकांच्या ऐन वाढीच्या कालावधीत पावसाने खंड दिल्यामुळे पिके करपून जात आहेत. समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे पाणी व चाऱ्याचा प्रश्न निर्माण होणार आहे.तालुक्यातील मुख्य पिके असलेल्या भात, सोयाबीन, भुईमूग, ऊस तसेच आंतरपिकांचे सरासरी ५० टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झाले आहे.’या साऱ्या बाबीचा विचार करुन महसूल व कृषी यंत्रणेद्वारे गडहिंग्लज तालुक्यातील पर्जन्यमान व पीक परिस्थितीचा फेरआढावा घ्यावा. गडहिंग्लज तालुक्याचा समावेश दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत करावा.’असे कुपेकर यांनी म्हटले आहे.