ज्ञानेश कुमार, भाजपच्या विरोधात काँग्रेसची कोल्हापुरात जोरदार निदर्शने
schedule28 Sep 26 person by visibility 25 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या मनमानी कामकाज व भाजप सरकारच्या दडपशाही विरोधात कोल्हापुरात काँग्रेसतर्फे जोरदार निदर्शने करण्यात आली. सोमवारी 28 सप्टेंबर 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाचे सकाळी 11 वाजता आंदोलन पुकारले होते. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील, माजी आमदार राजू आवळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा देत भाजप सरकारचा निषेध केला. तसेच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनामाची मागणी केली.
' चले जाओ चले जाव ज्ञानेश कुमार चले जाओ, काकी चड्डी काळी टोपी चले जाव नही चलेगी नही चलेगी दादागिरी नही चलेगी, भाजप सरकारचा धिक्कार असो' अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. ' आयोग निष्पक्ष हवा, निवडणूक निष्पक्ष हवी, प्रश्न निवडणूक आयोगाला उत्तर भाजप का देतो, निवडणूक आयोग वाचवा देश वाचवा, मतांची चोरी चालणार नाही, ज्ञानेश कुमार राजीनामा द्या, भाजप हटाव देश बचाव' हे फलक लक्ष वेधून घेत होते. ' देश का नेता कैसा हो राहुल गांधी जैसा हो, राहुल गांधी तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, सतेज पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है.' अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. काँग्रेसच्या नेत्यांनी यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनामाची मागणी केली.
आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी बाळासाहेब सरनाईक, सरला पाटील शशांक बावचकर, शहराध्यक्ष प्रवीण केसरकर, महापालिकेतील विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, गटनेते इंद्रजीत बोंद्रे, नगरसेवक संजय मोहिते, राहुल माने, सुभाष बुचडे, विनायक फाळके, स्वाती येवलुजे, दिपाली घाटगे, स्वाती कांबळे, डॉ. सुषमा जरग, विशाल चव्हाण, माजी उपमहापौर सुलोचना नायकवडे, माजी नगरसेविका उमा बनछोडे, अजित पोवार धामोडकर, सुजिय पोतदार, महेश जाधव, तौफिक मुलानी, संपतराव चव्हाण पाटील, वैशाली महाडिक, विनायक घोरपडे, वेदवती मोहिते, सुयोग मगदूम, प्रवीण पाटील आदींचा सहभाग होता.