यशाचे रंग उधळत चला, देशाचे नाव उज्ज्वल करा -कुलगुरुंनी दिल्या खेळाडूंना शुभेच्छा
schedule10 Jul 25 person by visibility 45 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर यशाचे रंग उधळत चला, स्वतःबरोबरच विद्यापीठाचे आणि देशाचे नाव उज्ज्वल करा, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण अधिविभागातर्फे आयोजित ‘कलर पुरस्कार प्रदान समारंभ २०२३-२४’ कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते.शिवाजी विद्यापीठाचे क्रीडापटू दरवर्षी विविध राष्ट्रीय स्पर्धांमध्ये विविध पदके जिंकून चमकदार कामगिरी बजावतात. अशा क्रीडापटूंचा विद्यापीठाचे स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र, रोख पारितोषिक तसेच सन्मानाचे ब्लेझर देऊन दरवर्षी गौरव करण्यात येतो. आजच्या कार्यक्रमात अखिल भारतीय स्तरावरील स्पर्धांत विविध पदके प्राप्त करणारे ८३ क्रीडापटू, खेलो इंडिया स्पर्धेत पदक मिळविणारे २९ क्रीडापटू आणि त्यांचे प्रशिक्षक व संघ व्यवस्थापक यांचा कुलगुरू डॉ. शिर्के यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम झाला.
यावेळी शिवछत्रपती पुरस्कार विजेते क्रीडापटू कल्याणी पाटील, श्रुती भोसले, पृथ्वीराज पाटील, साक्षी बनसोडे, दीपाली गुरसाळे, धनंजय जाधव, श्रीधर निगडे, गिरीष जकाते यांचा उपस्थितीत तर आदिती स्वामी, ऐश्वर्या पुरी यांचा त्यांच्या अनुपस्थितीत गौरव करण्यात आला. आंतरराष्ट्रीय खेळाडू रोहन कांबळे यांचाही यावेळी गौरवपूर्ण उल्लेख करण्यात आला. डॉ. नीलेश पाटील, डॉ. आय.एच. मुल्ला, आर.टी. पाटील, डॉ. विक्रमसिंह नांगरे, डॉ. प्रताप जाधव, टी.आर. साबळे, बी.ए. समलेवाले, दीपक पाटील, डॉ. सुनील खराडे, शिवाजी दाभाडे, डॉ. एन.डी. पाटील आदींचा गौरव करण्यात आला. यावेळी क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. एन.डी. पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर किरण पाटील यांनी आभार मानले. मंचावर परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, प्राचार्य डॉ. रमेश कुंभार, डॉ. राजेंद्र रायकर, विकास जाधव उपस्थित होते.