चला टोपी घालू या, कोरगांवकर हायस्कूलचा आनंददायी उपक्रम
schedule13 Jul 26 person by visibility 13 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन कोल्हापूर : आंतरभारती शिक्षण मंडळ संचलित सदर बाजार येथील कोरगांवकर हायस्कूलमध्ये आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत इयत्ता पाचवी ते इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी टाकाऊपासून टिकाऊ या उपक्रमांतर्गत कागदी गांधी टोप्या बनवून शनिवार आनंददायी केला. सर्व विदयार्थ्यांना शाळेतील साहाय्यक शिक्षिका इंद्रायणी पाटील यांनी "चला टोपी घालूया" या अंतर्गत कार्यशाळा घेतली. या कार्यशाळेमध्ये त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना कागदाचा आधार घेऊन गांधी टोपी कशी बनवावी याचे प्रात्यक्षिक घेतले. राज्य सरकारच्या आनंददायी शनिवार या उपक्रमांतर्गत कोरगांवकर हायस्कूलमध्ये दर शनिवारी शिक्षकांकडूनच आनंददायी शनिवार या उपक्रमाचे सादरीकरण केले जाते . गेल्या शनिवारी सदाशिव -हाटवळ यांनी विद्यार्थ्यांना ध्यानधारणा आणि योगासनाद्वारे एकाग्रता कशी वाढवावी याचे प्रात्यक्षिक घेतले होते . यावेळी इंद्रायणी पाटील यांनी तयार करून घेतलेली कागदी गांधी टोपी उपस्थित शिक्षकांनी डोक्यावर घातली. या उपक्रमांमध्ये मुख्याध्यापक संजय सौंदलगे, हेमलता पाटील, मीना बुचडे, राजेंद्र कुंभार, शीतल गणेशा चार्य, तृप्ती रावराणे, अभिलाषा माळी यांनी सहभाग घेतला