Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
प्राचार्य व्ही. एम. पाटील यांचा जीवनप्रवास म्हणजे संघर्षातून घडलेला यशाचा दीपस्तंभकोल्हापुरातील आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान चार वर्षात उभारणार, लवकरच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मैदानाचा करार आषाढी वारीत रंगले संभाजीराजे ! युवराज्ञी संयोगिताराजे, शहाजीराजेही सहभागी !!चला टोपी घालू या, कोरगांवकर हायस्कूलचा आनंददायी उपक्रम खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक  पतसंस्थेची  कर्ज मर्यादा ५५ लाख - चेअरमन साताप्पा कासारकामगार नेते कॉम्रेड बाबा यादव यांचे निधनविवेकानंद कॉलेजमध्ये   सदानंद  दुर्गुळे यांचा सेवागौरव सोहळा विवाहातील आहेरची रक्कम अंधशाळेला भेट, वाझे परिवाराचा स्तुत्य उपक्रमपदोन्नती प्रक्रियेला ब्रेक ! पदाधिकारी -अधिकारी - शिक्षक संघटना प्रतिनिधींची संयुक्त बैठक !!केआयटीचा प्लेसमेंटमध्ये नवा इतिहास ! १५७ कंपन्यांकडून ६५२ विद्यार्थ्यांची  निवड !!

जाहिरात

 

कोल्हापुरातील आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान चार वर्षात उभारणार, लवकरच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मैदानाचा करार

schedule13 Jul 26 person by visibility 13 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर  : ‘कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानासाठी राज्य सरकारकडून तीस एकर जागा ९० वर्षाच्या करारान्वये मिळणार आहे. या मैदानातील करारासंबंधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीमध्ये कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनची करार होणार आहे. हे मैदान तीन ते चार वर्षात उभारले जाईल.’ अशी ग्वाही कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी दिली.

कोल्हापूर जिल्हा क्रिकेट (केडीसीए) असोसिएशनतर्फे  ५८ वा  वार्षिक वितरण समारंभ आयोजित केला होता. विविध गटातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडू, प्रशिक्षक व संघाचा गौरव करण्यात आला. ताराबाई पार्क येथील धैर्यप्रसाद हॉल येथे हा कार्यक्रम झाला. याप्रसंगी बोलताना युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी कोल्हापूर नजीक होणारे हे क्रिकेटचे मैदान पश्चिम महाराष्ट्र, कोकण व सीमाभागातील खेळाडूंना वरदान ठरेल. केडीसीएच्या या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानासाठी गेली पावणे दोन वर्षे मी अक्षरश राजकारणापासून बाजूला आहे. कोल्हापूर परिसरात होणारे हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान एक स्वप्नवत प्रकल्प आहे. ते पूर्ण करण्याचे आव्हान मी स्वीकारले आहे. असोसिएशनमार्फत सरकारकडे १५ एकर जागा मागितली होती. तत्कालिन उपमुख्यमंत्री अजित पवार व पाच मुख्य सचिवांनी ३० एकर जागेचे नियोजन केले आहे. मैदानाठी आवश्यक निधी उभा करू. येत्या चार वर्षात हे मैदान उभारण्यासाठी सारे प्रयत्नशील आहेत.या मैदानावर आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने, टी २०, कसोटी सामने होतील.मैदानाची उभारणी अद्ययावत पद्धतीने करू.’    

जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव मदन शेळके यांनी प्रास्ताविक केले. माजी अध्यक्ष ऋतुराज इंगळे यांनी खेळाडूंची कामगिरी मांडली. राजाराम कॉलेजच्या प्राचार्या अनिता बोडके, दि इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्राचार्य डॉ. संजय दाभोळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा पारितोषिक वितरण समारंभ झाला. यावेळी अभिषेक सोनी, संजय यादव, शैलेश भोसले, चंद्रकांत महाजन, अशोक पाटील, वैभव पाटील, एन. एन. पाटील, बापूसाहेब मिठारी, प्रसाद पत्की, विनोद डुणुंग, इंद्रजीत चव्हाण, नितीन सावर्डेकर आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes