Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
प्राचार्य व्ही. एम. पाटील यांचा जीवनप्रवास म्हणजे संघर्षातून घडलेला यशाचा दीपस्तंभकोल्हापुरातील आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान चार वर्षात उभारणार, लवकरच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मैदानाचा करार आषाढी वारीत रंगले संभाजीराजे ! युवराज्ञी संयोगिताराजे, शहाजीराजेही सहभागी !!चला टोपी घालू या, कोरगांवकर हायस्कूलचा आनंददायी उपक्रम खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक  पतसंस्थेची  कर्ज मर्यादा ५५ लाख - चेअरमन साताप्पा कासारकामगार नेते कॉम्रेड बाबा यादव यांचे निधनविवेकानंद कॉलेजमध्ये   सदानंद  दुर्गुळे यांचा सेवागौरव सोहळा विवाहातील आहेरची रक्कम अंधशाळेला भेट, वाझे परिवाराचा स्तुत्य उपक्रमपदोन्नती प्रक्रियेला ब्रेक ! पदाधिकारी -अधिकारी - शिक्षक संघटना प्रतिनिधींची संयुक्त बैठक !!केआयटीचा प्लेसमेंटमध्ये नवा इतिहास ! १५७ कंपन्यांकडून ६५२ विद्यार्थ्यांची  निवड !!

जाहिरात

 

आषाढी वारीत रंगले संभाजीराजे ! युवराज्ञी संयोगिताराजे, शहाजीराजेही सहभागी !!

schedule13 Jul 26 person by visibility 27 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : वारीची महाराष्ट्राला मोठी परंपरा. वारकरी संप्रदायाचे अखंड श्रद्धेचे प्रतिक म्हणजे वारी. दरवर्षी आषाढी वारीत लाखो वारकरी विठूनामाचा गजर करत पंढरीकडे मार्गस्थ होते. या वारीत संत तुकाराम पालखी सोहळा वारकऱ्यांचा श्रद्धेचा आणि जिव्हाळयाचा. यंदाच्या आषाढी पालखी सोहळयात युवराज संभाजीराजे, युवराज्ञी संयोगिताराज आणि यौवराज शहाजीराजे छत्रपती सहभागी झाले. श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी रथाचे सारथ्य केले. वारकऱ्यांच्यामध्ये सहभागी होऊन फेर धरला.

संत तुकाराम पालखी प्रस्थान सोहळा देहू येथून झाला. पालखी प्रस्थान सोहळा हा अतिशय भक्तीमय वातावरणात झाला. श्रद्धेचे प्रतिक असलेल्या श्री जगद्गगुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान पूजनासाठी श्री संत तुकाराम महाराज संस्थान देहू यांच्यावतीने संभाजीराजे छत्रपती यांना सपत्नीक आमंत्रित केले होते. याप्रसंगी यौवराज शहाजीराजे छत्रपती उपस्थित होते. त्यांच्या हस्ते पालखी पूजन व स्वराज्याचा भगवा ध्वज अर्पण करण्यात आला. पुणे येथेही त्यांनीही वारीत सहभाग घेतला.‘आषाढी वारीतील सहभाग, पालखी पूजनाचा सन्मान हा आमच्यासाठी परमोच्च आनंदाचा क्षण होता.’अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes