कोल्हापूर महापालिकेने केले सोलापूरच्या ठेकेदारला ब्लॅक लिस्ट, कामातील दिरंगाई भोवली
schedule23 Apr 25 person by visibility 67 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महापालिका क्षेत्रात रस्त्याचे दुतर्फा पाच हजार झाडांचे वृक्षारोपण, दोन वर्षाकरीता देखभाल या कामात हलगर्जींपणा केल्याबद्दल सोलापूर येथील ठेकेदार आकाश उत्तम कानडे यांचा कोल्हापूर महापालिकेने काळया यादीत समावेश केला आहे. दहा ऑक्टोबर २०२४ रोजी त्यांना कार्यारंभाचा आदेश दिला होता.
कार्यादेश देऊनही ठेकेदाराने काम सुरु केले नाही. काम तातडीने सुरु करावे यासंदर्भात कानडे यांना वेळोवेळी तीन नोटीस बजावण्यात आल्या होत्या. या नोटशीस ठेकेदार याने कोणताही प्रतिसाद दिला नाही. दूरध्वनीवरुन संपर्क करण्यात आला. यासही ठेकेदाराकडून कोणताही प्रतिसाद मिळला नाही. त्यामुळे या कामाबाबत ठेकेदार नकारात्मक असल्याचे स्पष्ट झाले. परिणामी त्यांची सुरक्षा अनामत रक्कम जप्त करण्यात आली. तसेच या ठेकेदाराचा काळया यादीत समावेश केला.