कोल्हापूर हायस्कूलचा रविवारी अमृतमहोत्सवी सोहळा
schedule17 Apr 23 person by visibility 1034 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : श्री जगद्गुरु पंचाचार्य एज्युकेशन सोसायटी संचलित कोल्हापूर हायस्कूलचा अमृत महोत्सवी सोहळा रविवारी (२३ एप्रिल २०२३ ) साजरा होत आहे. यानिमित्त माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा आयोजित केला आहे अशी माहिती हायस्कूलचे मुख्याध्यापक विवेकानंद हिरेमठ व माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत मनोळे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
रविवारी दिवसभर कोल्हापूर हायस्कूल येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी सकाळी ११.३० वाजता अमृतमहोत्सवी सोहळ्याचे उद्घाटन होईल. आमदार जयश्री जाधव व शिक्षक आमदार जयंत आसगावकर हे प्रमुख पाहुणे म्हणून तर संस्थेचे अध्यक्ष एम.जी. वालिखिंडी यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ होत आहे. माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, माजी नगरसेविका तेजस्विनी इंगवले, जयश्री चव्हाण, माजी नगरसेवक मधुकर रामाणे , श्रीकांत बनछोडे, संस्थेचे खजानिस रंगराव जोंदाळ आणि शिक्षक नेते दादासाहेब लाड यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
कोल्हापूर हायस्कूलची सुरुवात १५ जून १९४७ मध्ये झाली. शिक्षण प्रसारक मंडळाचे शिक्षण महर्षी एम आर देसाई व बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर यांनी शाळेची स्थापना केली. १९९६ मध्ये श्री जगद्गुरु पंचाचार्य एज्युकेशन सोसायटीकडे या शाळेचे हस्तांतरण झाले. शाळेची नवीन इमारत २००० मध्ये बांधली आहे. कोल्हापूर हायस्कूल येथे सध्या इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत शिक्षण उपलब्ध आहे. विज्ञान आणि वाणिज्य शाखेतील कनिष्ठ महाविद्यालय आहे. शाळेला मोठी परंपरा लाभलेले आहे. प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकारी भूषण गगराणी, आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू व कुस्ती प्रशिक्षक राम सारंग हे संस्थेचे माजी विद्यार्थी आहेत. सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय सहकार, राजकीय, क्रीडा अशा विविध क्षेत्रात माजी विद्यार्थ्यांनी नावलौकिक मिळविला आहे.
कष्टकऱ्यांची मुले या शाळेत शिकतात. शैक्षणिक गुणवत्ते सोबतच कुस्ती कबड्डी जुदो मलखांब अशा विविध खेळांमध्ये कोल्हापूर हायस्कूलचा खेळाडूंनी राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी केली आहे. कोल्हापूर हायस्कूल तर्फे गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत केली जाते याशिवाय सायकल बँकिंग ही संकल्पना राबविण्यात येत आहे. दहा हुशार व गरजू विद्यार्थ्यांना हायस्कूलमध्ये शिक्षण संपेपर्यंत सायकल दिली जाते. याशिवाय हुशार विद्यार्थ्यांना पारितोषिके दिली जातात. कोल्हापूर हायस्कूलच्या अमृत महोत्सव सोहळ्यानिमित्त आजी माजी विद्यार्थ्यांचा हाच नाही मिळावा आतापर्यंतच्या वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा आहे. या या सोहळ्यासाठी आतापर्यंत साडेपाचशे हून अधिक माजी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. रविवारी प्रभातफेरी, सांस्कृतिक कार्यक्रम, माजी विद्यार्थ्यांचे मनोगत असे विविध कार्यक्रमांची दिवसभर रेल्वे असणार आहे असे मुख्याध्यापक हिरेमठ यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला दीपक पाटील, एस एन गडकरी, रफिक जमादार, प्राध्यापक सुजय पाटील आदी उपस्थित होते