कोल्हापूर फर्स्टच्या कार स्टिकर्सचे अनावरण, भवानी मंडपात खासदारांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम
schedule30 Mar 25 person by visibility 226 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर शहराच्या भविष्यातील सर्वांगीण विकासासाठी चौदा संघटनांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या 'कोल्हापूर फर्स्ट' या फोरमच्या कार स्टिकर्सचे अनावरण गुढीपाडव्याच्या दिनी झाले. ऐतिहासिक भवानी मंडपात तुळजाभवानी मंदिर येथे हा कार्यक्रम झाला. खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते व खासदार धनंजय महाडिक, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व आमदार राजेश क्षीरसागर, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, कोल्हापूर फर्स्टचे समन्यवक सुरेन्द्र जैन, सहसमन्वयक सर्जेराव खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत 'कोल्हापूर फर्स्ट' या कार स्टीकरचे अनावरण करण्यात आले.
कोल्हापूर शहराचा शाश्वत विकास करणे, कोल्हापूरचे ऐतिहासिक धार्मिक महत्त्व अबाधित ठेवून 'नेक्स्ट जनरेशन'साठी अपेक्षित कोल्हापूर बनविण्यासाठी 'कोल्हापूर फर्स्ट' या फोरमचा मुख्य उद्देश असून तो साध्य करण्यासाठी आपण सर्वजण एकत्रितपणे काम करू अशी ग्वाही खासदार शाहू महाराज यांनी दिली.या फोरमच्या माध्यमातून कोल्हापूरचा सर्वांगीण विकासासाठी नक्कीच प्रत्यन करून अशी ग्वाही खासदार महाडिक यांनी दिली. 'कोल्हापूर फर्स्ट' माध्यमातून सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने मांडलेल्या मुद्यांवर एकत्रितपणे काम करू अशी ग्वाही क्षीरसागर यांनी दिली.
कार्यक्रमास मॅकचे अध्यक्ष मोहन कुशिरे, उपाध्यक्ष विठ्ठल पाटील,संचालक हरिश्चंद्र धोत्रे,केईए अध्यक्ष बाबासो कोंडेकर, कुशल सामाणी, हॉटेल मालक संघ अध्यक्ष उज्ज्वल नागेशकर, कोल्हापूर जिल्हा बार असो. उपाध्यक्ष निशिकांत पाटोळे, राजू ओतारी, आयटी असोसिएशन अध्यक्ष प्रताप पाटील, उपाध्यक्ष विश्वजीत देसाई,राहुल मेंच, शांताराम सुर्वे, दि इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स अध्यक्ष अजय देशपांडे, जयदीप बागी, कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अमोल कडोलिकर, जितोचे नेमचंद संघवी, इन्स्टिटयू ऑफ कंपनी सेक्रेटरी कोल्हापूर चॅप्टर अध्यक्ष जयदीप पाटील, उपाध्यक्ष स्वप्निल पाटोळे, माजी अध्यक्ष सचिन बिडकर, जयदीप मोरे, विकास जगताप, शंतनू गायकवाड उपस्थित होते.