कोल्हापूर इंजिनीअरिंग असोसिएशनचा ७८ वा वर्धापनदिन साजरा
schedule24 Jul 25 person by visibility 79 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर इंजिनीअरिंग असोसिएशनचा ७८ वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. आमदार सतेज पाटील प्रमुख पाहुणे होते. इंजिनीअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष कमलाकांत कुलकर्णी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
याप्रसंगी बोलताना आमदार पाटील म्हणाले, ‘कोल्हापूर इंजिनीअरिंग असोसिएशनने एआयसारख्या नवीन तंत्रज्ञानाच्या आणखी अभियाना घेतला पाहिजे. असोसिएशनने उद्योगांना व्यासपीठ दिले. कोल्हापूरसह राज्याच्या विकासाचा प्रकाश पुढे नेणे हे आपले कर्तव्य आहे. कोल्हापूर इंजिनीअरिंग असोसिएशनने भविष्यामध्ये स्पर्धात्मक राहण्यासाठी एआयसारखी नवीन गोष्टी, नवीन तंत्रज्ञान कोल्हापूरमध्ये आणण्याचा संकल्प करावेत. संस्थापक उद्योजकांनी उद्यमनगरीचा पाया भक्ककम केला आहे. आता उत्पादन वाढीसाठी नवे तंत्रज्ञान आत्मसात करावे.’ असोसिएशनचे अध्यक्ष कमलाकांत कुलकर्णी यांनी असोसिएशनच्या वाटचालीचा आढावा घेतला. उपाध्यक्ष श्रीकांत दुधाणे यांनी, इंजिनीरिंग असोसिएशन उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी नेहम प्रयत्नशील आहे.’असे सांगितले. याप्रसंगी आमदार पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
असोसिएशनचे सचिव कुशल सामानी, संचालक संजय आंगडी, दिनेश बुधले, नितीन वाडीकर, सुरेंद्र जैन, सचिन मेनन, बाबासो कोंडेकर, राजू पाटील, प्रदीप कापडिया, अजित कोठारी, सुनील शेळके, मोहन कुशिरे, संजय पेंडसे, संजय शेटे, राहुल पाटील, अतुल अरवाडे, हर्षद दलाल, अमर करांडे, अभिषेक सावेकर, जयदीप आंबी, जयदीप मांगोरे, धनंजय दुग्गे, सुधाकर सुतार, उज्ज्वल नागेशकर, प्रकाश चरणे, हिंदुराव कामते, विज्ञान मुंडे, हरिश्चंद धोत्रे, किरण वसा आदी उस्थित होते. खजानिस प्रसन्न तेरदाळकर यांनी आभार मानले.