कोल्हापूर चित्पावन संघातर्फे आपत्तीग्रस्तांना मदत
schedule27 Nov 25 person by visibility 17 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : धार्मिक-सांस्कृतीक आणि समाज उन्नत्तीसाठी काम करणाऱ्या कोल्हापूर चित्पावन संघातर्फे सामाजीक बांधीलकी जपण्याचेही काम हाती घेतले आहे. नुकतेच विधर्भ-मराठवाडा प्रांतात पडलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभुमीवर संघाकडून आपत्तीग्रस्त नागरीकांसाठी २५ हजार रुपयांची मदत देण्यात आली आहे. ही मदत मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाकडे सुपुर्त करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, कक्षाचे डॉ. चंद्रकांत परुळेकर यांनी चेक स्विकारला.
यावेळी संघाचे अध्यक्ष मकरंद करंदीकर म्हणाले, चित्पावन संघामार्फत वर्षभर विविध उपक्रम राबवले जातात. पण समाजाचे आपणही काही देणे लागतो या हेतूने आम्ही राज्यातील नुकसानग्रस्त नागरीकांसाठी मदत देऊ केली आहे. उपाध्यक्ष प्रसाद भिडे यांनी संघातर्फे राबवण्यात येणाऱ्या परशुराम जन्मोत्सव, धुंधुरमास अष्टमी जागर सोहळ्याची माहिती दिली. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे याचा सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यवाह केदार जोशी, संतोष साने, सीए विकास परांजपे, सिमा गोखले, नंदकुमार मराठे, निखिल गोखले, श्रीकांत लिमये, दत्तात्रय आपटे, संगिता आपटे, ऋषिकेश लिमये, किरण जोशी, सौरभ पाटणकर, गोपाळ गोरे उपस्थीत होते.