लिंगायत माळी समाजाचा चौदा डिसेंबरला राज्यस्तरीय वधू वर मेळावा
schedule26 Nov 25 person by visibility 28 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : लिंगायत माळी समाज कोल्हापूर जिल्हा संघटनेचा राज्यस्तरीय वधू- वर मेळावा, समाज मेळावा आणि पुरस्कार वितरण समारंभ रविवार दिनांक 14 डिसेंबर रोजी होणार आहे. सकाळी साडेदहा वाजता राजारामपुरी येथील व्ही. टी. पाटील सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
लिंगायत माळी समाजाच्या वतीने दरवर्षी समाज मेळावा, वधू-वर मेळाव्याचे आयोजन केले जाते. यंदाही 14 डिसेंबर रोजी होणाऱ्या या कार्यक्रमात समाजभूषण आणि जीवनगौरव पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. या मेळाव्याच्या तयारीसाठी संचालक मंडळाची बैठक घेण्यात आली. यावेळी समाजाचे अध्यक्ष गुरुबाळ माळी, उपाध्यक्ष अनिल माळी कार्याध्यक्ष संतोष माळी, राजाराम यादव, किशोर माळी, अशोक माळी, शशिकांत माळी, बाळासाहेब माळी, राजू माळी, दयानंद माळी, महेश माळी, संतोष माळी सर, संजू कोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या मेळाव्यास उपस्थित रहावे असे आवाहन समाजाचे जिल्हाध्यक्ष गुरुबाळ माळी व महिला संघटनेच्या जिल्हाध्यक्ष श्रीमती वंदना माळी यांनी केले आहे.