महापालिका निवडणुकीसाठी मतदार यादीचा सुधारित कार्यक्रम, हरकतीसाठी मुदत वाढवली
schedule26 Nov 25 person by visibility 75 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : प्रारुप मतदार यादीतील प्रचंड चुका, दुसऱ्या प्रभागात नावांचा समावेश यावर सर्वच राजकीय पक्षांनी आक्षेप नोंदविल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीचा सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश कांकाणी यांनी, राज्यातील २९ महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार यादीचा सुधारित कार्यक्रम घोषित केला. त्यानुसार आता प्रारुप मतदार यादीवर आता हरकती व सूचना दाखल करण्याची मुदत तीन डिसेंबर २०२५ पर्यंत वाढविली आहे. यापूर्वी मतदार यादीवर हरकती दाखल करण्याची मुदत २७ नोव्हेंबर पर्यंत होती. नव्या सुधारित कार्यक्रमानुसार प्रारुप मतदार यादीवर दाखल हरकती व सूचना विचारात घेऊन अंतिम मतदार यादी दहा डिसेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्याच्या सूचना आहेत.तर मतदान केंद्रांच्या ठिकाणांची यादी पंधरा डिसेंबर रोजी तर मतदान केंद्रनिहाय मतदार यादी २२ डिसेंबर २०२५ रोजी जाहीर करण्यात येणार आहे.