नितीन वाडीकर, सचिन शानबाग, रोहिणी परांडेकर, विजय पत्की , सुहास जोशींना पुरस्कार
schedule26 Nov 25 person by visibility 58 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : " ब्राह्मण बिझनेस फोरमतर्फे समाजातील कर्तबगार व्यक्तींना उत्कृष्ट उद्यमशीलता पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. यंदा हा पुरस्कार कारखानदार नितीन वाडीकर, बांधकाम व्यवसायिक विजय पत्की , डॉ. रोहिणी परांडेकर, हॉटेल व्यवसायिक सचिन शानबाग व पौरोहित्य करणारे सुहास जोशी यांना जाहीर झाला आहे" अशी माहिती फोरमचे अध्यक्ष प्रसाद धर्माधिकारी व उपाध्यक्ष नरेंद्र जोशी यांनी दिली.
पुरस्कार वितरण समारंभ 30 नोव्हेंबर 2025 रोजी पाटील हॉटेल सयाजी येथे सकाळी साडेनऊ वाजता होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून क्रीडा विश्लेषक सुनंदन लेले व वैद्यकीय क्षेत्रातील अर्जुन देशपांडे उपस्थित राहणार आहेत. मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यंदा पुरस्काराचे सातवे वर्ष आहे.
पुरस्कार सोहळ्यानंतर प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शन होईल. यानंतर दिवसभर विविध विषयावर तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. समाजामध्ये उद्यमशीलता वाढावी. तरुण उद्योजक श, कारखानदार घडावेत. व्यवसायिक निर्माण व्हावेत यासाठी ब्राह्मण बिझनेस फोरमतर्फे दरवर्षी ब्रह्म उर्जा उद्योग परिषद आयोजित केली जाते असे यावेळी सांगण्यात आले. पत्रकार परिषदेला अजिंक्य देशपांडे, अभिजीत कुलकर्णी, शैलेश देशपांडे, संतोष पंडित, पराग जोशी, प्रदीपकुमार लिंगसुर, राजश्री छत्रे आदी उपस्थित होते