केआयटीच्या विश्व तांबेचे टेबल टेनिस स्पर्धेत यश
schedule14 Apr 25 person by visibility 250 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर येथील केआयटी अभियांत्रिकी (प्रदत्त स्वायत्त) अभियांत्रिकी महाविद्यालयाचा तृतीय वर्ष मेकॅनिकल विभागातील विद्यार्थी विश्व तांबे यांनी राष्ट्रीय स्तरावरील पॅरा (दिव्यांग) टेबल टेनिसच्या क्लास १० गटात दैदीप्यमान यश संपादन केले आहे.
वडोदरा गुजरात येथे झालेल्या अल्टिमेट टेबल टेनिसच्या दुसऱ्या पॅरा नॅशनल रँकिंग चॅम्पियनशिप २४-२५ स्पर्धेमध्ये पुरुष एकेरी मध्ये कांस्यपदक,मिक्स डबल मध्ये सुवर्णपदक, पुरुष एकेरी मध्ये रजत पदक, पुरुष दुहेरी मध्ये कांस्यपदक प्राप्त केले. तसेच २४-२७ मार्च २५ रोजी दिल्ली येथे संपन्न झालेल्या खेलो इंडिया पॅरा गेम्स मध्ये पुरुष एकेरी मध्ये सुवर्णपदक प्राप्त केले. संस्थेचे अध्यक्ष साजिद हुदली, उपाध्यक्ष सचिन मेनन, सचिव दीपक चौगुले, संचालक डॉ.मोहन वनरोट्टी, मेकनिकल विभाग प्रमुख डॉ.उदय भापकर यांचे प्रोत्साहन लाभले. भविष्यात विश्वने आंतरराष्ट्रीय स्तरावरील ऑलम्पिकमध्ये अशीच दर्जेदार कामगिरी करावी अशा शुभेच्छा दिल्या.महाविद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख प्रा.विजय रोकडे यांचे मोलाचे मार्गदर्शन त्याला मिळाले
.