केआयटीमध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा
schedule19 Oct 25 person by visibility 50 category

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : केआयटी अभियांत्रिकी (प्रदत्त स्वायत्त) महाविद्यालयाच्या मध्यवर्ती ग्रंथालयातर्फे ‘वाचन प्रेरणा दिन’ या निमित्ताने ‘रिसर्च पब्लिकेशन्स : रिसर्च पेपर रायटिंग, स्कोपस जर्नल्स, सायटेशन अँड एच-इंडेक्स’’ या विषयावर ऑनलाईन परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलम यांच्या जयंतीनिमित्त ‘संविधान वाचन’ करण्यात आले.
या परिसंवादास शिवाजी विद्यापीठातील नॅनोसायन्स अँड बायोटेक्नॉलॉजी शाखेचे सहाय्यक संचालक डॉ. तुकाराम डोंगळे यांनी मुख्य वक्ता म्हणून सहभाग घेतला. संशोधन लेखन कसे असावे, दर्जेदार स्कोपस जर्नल्स कशी ओळखावीत, सायटेशन आणि एच-इंडेक्सचे महत्त्व यासंबंधी मार्गदर्शन केले.आज १५ ऑक्टोबर रोजी मध्यवर्ती ग्रंथालय, राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) व राष्ट्रीय कॅडेट कॉर्प्स (एनसीसी) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘संविधान वाचन’ करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात प्रा.वसुंधरा महाजनी यांच्या हस्ते डॉ. कलम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर प्रा. रणजीत पाटील व ग्रंथपाल डॉ. रोहन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संविधान वाचन केले,
महाविद्यालयाचे संचालक डॉ. मोहन वनरोट्टी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या दोन्ही कार्यक्रमास विद्यार्थी, संशोधक व शिक्षकांचा प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे संयोजन ग्रंथालयाचे मुख्य समन्वयक डॉ. मंदार डी. सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. डॉ. रोहन पवार यांनी प्रास्ताविक केले.अशा प्रकारच्या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष साजिद होली उपाध्यक्ष सचिन मेनन सचिव दीपक चौगुले यांचे प्रोत्साहन लाभले.