आंतरविद्याशाखीय अभ्यास म्हणजे वर्तमान मांडणीची नव्याने पुनर्मांडणी-डॉ. दिलीप चव्हाण
schedule19 Mar 25 person by visibility 147 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘आंतरविद्याशाखीय अभ्यास ही जगभर प्रचलित झालेली व मान्यता पावलेली अभ्यासप्रणाली आहे. भाषा आणि साहित्याचा संबंध अनेक विषयांशी, घटकांशी येतो. त्यामुळे भाषा आणि साहित्याचा अभ्यास आंतरविद्याशाखीय दृष्टीने केल्यास तो अधिक परिपूर्ण, समग्र व मूलगामी होईल. आंतरविद्याशाखीय अभ्यास म्हणजे दोन किंवा अधिक विषयातील परस्परसंबंध उलगडून दाखवणे नव्हे, तर वर्तमान मांडणीची नव्याने पुनर्मांडणी करणे होय ' असे मत स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठातील भाषा, साहित्य आणि संस्कृती अभ्यास संकुलाचे प्रमुख डॉ. दिलीप चव्हाण यांनी व्यक्त केले.
शिवाजी विदयापीठ कोल्हापूर, शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ आणि मराठी विभाग, नाइट कॉलेज ऑफ आर्टस अॅण्ड कॉमर्स कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित 'भाषा आणि साहित्याभ्यासाचे आंतरविद्याशाखीय स्वरुप' या विषयावरील दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र झाले. अध्यक्षस्थानी कौन्सिल ऑफ एज्युकेशनच्या अध्यक्षा रजनी मगदूम होत्या.
कौन्सिल ऑफ एज्युकेशनचे संचालक अॅड. अमित बाडकर, ‘शिविम'चे अध्यक्ष डॉ भरत जाधव, सचिव डॉ. मांतेश हिरेमठ, डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. रणधीर शिंदे, प्राचार्य डॉ . उत्तम पाटील, मराठी विभागप्रमुख अरुण शिंदे, समन्वयक डॉ .नंदकुमार कुंभार आदी उपस्थित होते. उद्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे, कौन्सिल ऑफ एज्युकेशनचे सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम होते. ‘शिविम’ च्या चौदाव्या अधिवेशनाचे अध्यक्ष डॉ. गोपाळ गावडे यांनी मराठी भाषा आणि साहित्यासमोर उभ्या असणाऱ्या आव्हानांची चर्चा केली. डॉ. रघुनाथ कडाकणे, डॉ. बाळासाहेब गणपाटील, सारिका उबाळे, डॉ, उदय पाटील, डॉ . अवनीश पाटील यांनी, डॉ. शरद भुताडिया यांचा चर्चासत्रात सहभाग होता. ज्ञानेश्वर बंडगर, संपत देसाई, श्रीराम मोहिते, फारुक काझी, डॉ .संजय साठे, डॉ. गौतम काटकर, डॉ. सुखदेव एकल, डॉ . महेश गायकवाड यांनी शोधनिबंधांचे वाचन केले. समारोप सत्रात ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉ . सुनीलकुमार लवटे यांनी फिनलंडच्या धर्तीवरील शिक्षणाची गरज व्यक्त केली.