Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
स्वातंत्र्यदिनापासून धावणार ई बसेस ! कोल्हापुरात होणार सिमेंटचे रस्ते !! कोल्हापूर जिल्ह्यातील २५१ गावांना ७६ कोटी मंजूरमहापुराच्या उपाययोजनेसंबंधी दोन खासदार, सात आमदारांचे जलसंपदामंत्र्यांना पत्रऋतुराज पाटील यांच्यावर वाढदिवसानिमित शुभेच्छाचा वर्षावगोकुळची निवडणूक महायुती म्हणून लढणार, मंत्री मुश्रीफ आमच्या सोबत असतील - धनंजय महाडिकवडिलांना मिठी मारताच नवीद मुश्रीफ झाले भावूककोल्हापूर महानगर भाजप अध्यक्षपदी विजय जाधवस्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी इंडिया आघाडी सरसावली, नेतेमंडळीची पदाधिकाऱ्यांच्यासोबत संयुक्त बैठक जागतिक स्तरावरील कॅन्सर उपचार आता कोल्हापुरात !णणजझ त

जाहिरात

 

जागा उपलब्ध झाल्यास कोल्हापुरात ३५० खाटांचे सेवा रुग्णालय उभारू-प्रकाश आबिटकर

schedule30 May 25 person by visibility 62 categoryआरोग्य

नियमावलीत शिथिलता दिल्यास कोल्हापुरात दुसरे चांगले आणि आवश्यक रुग्णालय उभे राहील – कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कसबा बावडा येथील सेवा रुग्णालयामधील ५० खाटांचे रुग्णालय १०० खाटांच्या रुग्णालयात रूपांतरित करण्याचे, मंजूर १०० खाटांचे जिल्हा रुग्णालय, मंजूर १०० खाटांचे महिला व नवजात शिशु रुग्णालय तसेच ५० खाटांचे क्रिटिकल केअर युनिट आदी कामांचा विस्तार जागेअभावी प्रलंबित आहे. या संदर्भात बफर झोनमध्ये शिथिलता मिळवून येत्या आठ दिवसांत जागेचा प्रस्ताव महानगरपालिकेकडे सादर करावा. जागा उपलब्ध झाल्यास, सीपीआर रुग्णालयास समांतर असे ३५० खाटांचे सुसज्ज रुग्णालय त्या ठिकाणी उभारता येईल. सूचना पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.

 शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथे त्यांच्या अध्यक्षतेखाली, तर राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत, सेवा रुग्णालयातील इमारत विस्तारीकरण व अद्ययावत यंत्रसामग्रीबाबत आढावा घेण्यात आला. या बैठकीस आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, कोल्हापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त महेंद्र पंडित, अॅड. ए. एम. पिरजादे, सेवा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. नीलिमा पाटील, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी निखिल घरत, उपप्रादेशिक अधिकारी व्ही. व्ही. किल्लेदार यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, ‘कोल्हापूर शहराची हद्द वाढ न झाल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कसबा बावडा परिसरातील नागरिकांसाठी सेवा रुग्णालय ही अत्यावश्यक सुविधा आहे. त्यामुळे रुग्णालयाच्या विस्तारीकरणाला बफर झोनमुळे अडथळा येऊ नये. त्या नियमांमध्ये शिथिलता देऊन तातडीने मंजुरी मिळावी.’ या बैठकीत त्यांनी सेवा रुग्णालयाला प्राप्त झालेल्या विविध यंत्रसामग्रीबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचे आभार मानले. नुकतेच राज्यस्तरावरून सेवा रुग्णालयासाठी कार्डियाक कॅथलॅब, सिटीस्कॅन व एमआरआय यंत्रसामग्री मंजूर करण्यात आली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes