तिटवे येथे होम मिनिस्टर स्पर्धा उत्साहात ! लतिका कांबळेने जिंकली मानाची पैठणी ! !
schedule21 Mar 25 person by visibility 87 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राधानगरी तालुक्यातील तिटवे येथील शहीद शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित "होम मिनिस्टर - खेळ खेळूया मानाच्या पैठणीचा" या अनोख्या स्पर्धेत विजेत्यांना सन्मानित करण्यात आले. लतिका कांबळे विजेत्या ठरल्या असून त्यांना मनाची पैठणी देऊन सन्मानित केले.
या स्पर्धेत अनेक महिलांनी उत्साहाने सहभाग घेतला आणि कार्यक्रमाचा आनंद लुटला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वीरपत्नी लक्ष्मीबाई पाटील होत्या. सुरुवातील रोप भेट देऊन माता-पालकांचे स्वागत करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला. स्पर्धेतील दृतीय आणि तृतीय क्रमांक विजेत्या अनुक्रमे सोनाली चौगले आणि सुजाता सूर्यवंशी यांना मिळाला देण्यात आले.
शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत पालकर यांनी प्रास्ताविक केले. या वेळी शहीद सीताराम पाटील कॉलेज ऑफ पीजीच्या प्राचार्या प्रा. सिद्धता गौड, शहीद सीताराम कॉलेज ऑफ फार्मसीच्या प्राचार्या प्रा. स्नेहल माळी, शहीद सीताराम पाटील कॉलेज ऑफ आर्किटेचरच्या प्राचार्या मनाली भंडारी, मुक्ताई कॉलेज ऑफ नर्सिंगच्या प्राचार्या प्रा. सरिता धनवडे, प्रा. सागर शेटगे, प्रा. दिग्विजय कुंभार उपस्थित होते. स्नेहा मगदूम आणि प्रा. शुभांगी भारमल यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या समन्वयक प्रा.अश्विनी कांबळे यांनी आभार मानले.