Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
आम्ही पाहिलाय काळ तुमच्या संघर्षाचा…म्हणूनच अभिमान आहे तुमच्या नेतृत्वाचा !! अमल महाडिकविवेकानंद  कॉलेज  कुशल मनुष्यबळ घडविणारे लोकप्रिय महाविद्यालय-प्राचार्य आर. आर. कुंभारविभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिली मेन राजाराम हायस्कूलला भेटअन् छत्रपती शिवरायांचा पुतळा पुन्हा विद्युत रोषणाईने उजळलाभाजपा कार्यकर्त्यांचा मिरजकर तिकटीला जल्लोषकोल्हापुरात बहरणार ५४ वे पुष्प प्रदर्शन ! महावीर उद्यान येथे विविध कार्यक्रम !!शहाजी कॉलेजच्या खेळाडूंचे विद्यापीठ आंतरविभागीय बॉक्सिंग स्पर्धेत यश  पोलीस क्रीडा स्पर्धेतील जनरल चॅम्पियनशीप सातारा-कोल्हापूर पुरुष गटाला विभागूनफोंडाघाटत टँकरला आगविधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस ! मुंबईत घोषणा, कोल्हापुरात आनंदोत्सव !!

जाहिरात

 

इनरव्हील क्लबमार्फत हॅपी स्कूल संकल्पना,  कॅन्सरविरोधी जनजागृतीवर फोकस- डिस्ट्रिक्ट चेअरमन ज्योतीकिरण दास

schedule29 Nov 24 person by visibility 120 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :

गर्भाशयाच्या मुखातील पेशींच्या (सर्व्हायकल) कॅन्सरसंबंधी जनजागृती आणि सरकारी शाळेमध्ये हॅपी स्कूल संकल्पनेंतर्गत विविध सुविधांची उपलब्धता यावर इनरव्हील क्लबचा फोकस असल्याचे इनरव्हील ७५ च्या डिस्ट्रिक्ट चेअरमन ज्योतीकिरण दास यांनी सांगितले.

इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर सनराइजतर्फे आयोजित कार्यक्रमासाठी त्या कोल्हापुरात आल्या होत्या. याप्रसंगी त्यांनी इनरव्हीलच्या विविध संकल्पना, भविष्यकालीन नियोजन यासंबंधी बोलल्या. इनरव्हील ही जगभरात कार्यरत संघटना आहे.महिलांना संघटित करुन विधायक काम केले जाते. इनरव्हीलच्या ७५ व्या डिस्ट्रिक्ट  चेअरमनपदी काम करतानाच अनुभव सांगताना त्या म्हणाल्या,‘चेअरमनपदाचा कालावधी हा एक वर्षाचा असतो. एक जुलै ते ३० जून हा वर्षभराच्या कालावधीची मुदत असते.

कॅन्सरविरोधी जनजागृतीवर आमचा भर आहे. मुलींमध्ये प्रबोधन केले जात आहे. सव्हार्यकल कॅन्सरविरोधी प्रबोधनासाठी इनरव्हीलमार्फत विविध उपक्रम राबविले जातात. शाळेत जाऊन मुलींशी संवाद, आरोग्य विषयक जागृती करण्यावर भर आहे. तसेच सरकारी शाळेत पायाभूत सुविधा उपलब्ध करुन दिल्या जात आहेत. पिण्याच्या पाण्याची सोय, स्वच्छतागृहे, शाळेसाठी आवश्यक साधनं पुरविली जातात. हॅपी स्कूलतंर्गत येत्या जून महिन्यापर्यंत १०१ शाळांमध्ये विविध प्रकारच्या सुविधांची उपलब्धता करण्याचे नियोजन आहे.’

इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर सनराइजच्या अध्यक्षा स्मिता सावंत-मांढरे म्हणाल्या, ‘इनरव्हील क्लब ऑफ सनराइजतर्फे चार शाळेत हॅपी स्कूल संकल्पना राबविली आहे. इनरव्हीलच्या अन्य क्लब मिळून जिल्ह्यात दहाहून अधिक शाळेत विविध प्रकारच्या सुविधांची पूर्तता केली आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरित केले आहे. कॅन्सरविरोधी जागृतीचे कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.’

पत्रकार परिषदेला इनरव्हील ७५ च्या डिस्ट्रिक्टच्या व्हाइस चेअरमन उत्कर्षा पाटील, नंदिनी पाटील, पूनम सरनाईक, दिव्या घाटगे, मनिषा जाधव, स्मिता खामकर आदी उपस्थित होत्या.

जाहिरात

 
Copyright © 2024. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes