Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गोकुळचा दूध वाढ गुणवत्ता सुधारणा कार्यक्रम, गावनिहाय पाच वर्षाचे मायक्रो प्लॅनिंगरग्गेडियन जिमचा चौथा वर्धापनदिन उत्साहात; रामकृष्ण हॉलमध्ये रंगला दिमाखदार सोहळा कुलगुरू राजनीश कामत  यांना लोकशिक्षक बाबा भारती जीवन गौरव पुरस्कारअभियंत्यांच्या योगदानातून साकारेल आत्मनिर्भर भारत – मेजर अभिजीत ताम्हणकरमाजी आमदार संजीवनीदेवी गायकवाड यांचे निधनकोल्हापूरच्या खंडपीठासाठी ४९५ पदांची नजीकच्या काळात भरती - न्यायमूर्ती रविंद्र घुगेजिल्हा परिषदेत ८० वा स्वातंत्र्यदिन साजरापाच चित्रकारांच्या कलाकृतींचे मुंबईत प्रदर्शनआता केएमटीच्या जागेवर डोळा, दोन भूखंड तीस वर्षासाठी भाडयाने देण्याचा प्रस्तावफुटबॉलच्या येत्या हंगामापासून मुलींच्यासाठी शाहू छत्रपती वूमेन्स लीग - मधुरिमाराजे छत्रपती

जाहिरात

 

गोकुळचा दूध वाढ गुणवत्ता सुधारणा कार्यक्रम, गावनिहाय पाच वर्षाचे मायक्रो प्लॅनिंग

schedule17 Aug 26 person by visibility 58 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : दररोज २५ लाख लिटर दूध संकलनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासोबतच दूध उत्पादन व गुणवत्तेत वाढ करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ पाच वर्षाचा कृतिशील कार्यक्रम आखला आहे. दूध उत्पादकांचा दुग्ध व्यवसाय अधिक आधुनिक, शास्त्रीय व फायदेशीर करण्यासाठी गोकुळमार्फत गेल्या तीन वर्षांपासून राबविण्यात येत असलेल्या कै. आनंदराव ज्ञा. पाटील (चुयेकर) दूध वाढ गुणवत्ता सुधारणाकार्यक्रमाला सुधारित कार्यपद्धतीमुळे अधिक गतिमान व कृतिशील स्वरूप दिले.

   या सुधारित कार्यपद्धतीच्या एस.ओ.पी. पुस्तिकेचे  गोकुळ दूध संघाचे प्रशासकीय अध्यक्ष प्रदीप मालगावे व प्रशासकीय मंडळाच्या सदस्यांच्या हस्ते संकलन विभागातील अधिकाऱ्यांकडे वितरण करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील २४५ गावांची निवड करण्यात आली असून, प्रत्येक गावातील पाच याप्रमाणे १,२२५ दूध संस्थांमध्ये कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. गोठा व्यवस्थापन सुधारणा आणि दूध व्यवसाय सुधारणा या दोन पातळ्यांवर काम केले जाणार आहे. प्रत्येक गावातील २० याप्रमाणे सुमारे ४,९०० म्हैस दूध उत्पादकांची निवड करून त्यांना तसेच त्यांच्या पती-पत्नींना गोठा व्यवस्थापन, पशुआरोग्य, वैरण, पशुखाद्य व दूध उत्पादन वाढीबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे. संबंधित गावातील सर्व दूध संस्था व उत्पादकांमध्ये दूध व्यवसाय सुधारणा कार्यक्रम राबविला जाणार आहे.

संकलन, पशुसंवर्धन, वैरण विकास, आहार संतुलन, पशुखाद्य, कृत्रिम रेतन, आर.बी.पी. व महिला नेतृत्व विभागांच्या समन्वयातून जंतनिर्मूलन, लसीकरण, सी.एम.टी. तपासणी, वंध्यत्व निवारण, गोचीड नियंत्रण, सायलेज, सुधारित वैरण, संतुलित आहार आणि स्वच्छ दूध निर्मितीवर भर दिला जाणार आहे.  पशुसंवर्धन योजनांचा लाभ तसेच गोकुळच्या विविध सेवा-सुविधा उत्पादकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहेत.

प्रत्येक निवडलेल्या गावात स्थानिक कार्यकारी समिती स्थापन केली जाणार असून, संकलन विस्तार सुपरवायझर यांच्या नेतृत्वाखाली महिला प्रतिनिधी, आर.बी.पी. स्वयंसेवक, कृत्रिम रेतन सेवक, दूध संस्थेचे चेअरमन-सचिव, रिसोर्स दूध उत्पादक, एल.एस.एस. व पशुवैद्यकीय अधिकारी यांचा सहभाग राहणार आहे. समितीमार्फत दरमहा गोठा भेटी व कामाचा आढावा घेतला जाईल. स्थानिक समितीची बैठक दरमहा, तर जिल्हास्तरीय समितीची बैठक दर तीन महिन्यांनी होईल. महिला आरोग्य कार्यक्रम, प्रशिक्षण व महिला शैक्षणिक सहलींचेही आयोजन करण्यात येणार आहे.

          प्रशासकीय अध्यक्ष प्रदीप मालगावे म्हणाले, “सुधारित कार्यपद्धतीमुळे दूध वाढ कार्यक्रम अधिक गतिमान होऊन पारंपरिक दुग्ध व्यवसायाला आधुनिक व शास्त्रीय पद्धतीची जोड मिळणार आहे. सर्व विभागांच्या समन्वयातून वैरण, पशुखाद्य, जनावरांचे आरोग्य व दूध उत्पादन वाढीसाठी सामूहिक प्रयत्न करून दूध उत्पादकांचा व्यवसाय अधिक किफायतशीर करण्यासोबत २५ लाख लिटर दूध संकलनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कार्यक्रम प्रभावीपणे राबविला जाईल.

          कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले म्हणाले, “दूध वाढीसोबत गुणवत्तेलाही समान महत्त्व देण्यात आले आहे. गोठ्यापासून दूध संस्थेपर्यंत प्रत्येक टप्प्यावर सुधारणा करून दूध उत्पादन व गुणवत्ता वाढविणे आणि दूध उत्पादकांचा व्यवसाय अधिक फायदेशीर करणे, हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. सर्व विभागांचा समन्वय व उत्पादकांचा सक्रिय सहभाग यामुळे कार्यक्रम अधिक परिणामकारक होईल.

          यावेळी प्राधिकृत अधिकारी  सदस्य सागर बलकवडे, डॉ. चंद्रकांत परूळेकर, गोकुळचे कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले, सहा. महाव्यवस्थापक (डेअरी) अनिल चौधरी, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील, रामकृष्ण पाटील, दत्तात्रय वाघरे, व्ही.डी.पाटील, धनाजी पाटील, डॉ. दयावर्धन कामत, भरत मोळे, डॉ.एम.पी.पाटील, संभाजी पाटील उपस्थित होते

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes