Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
राजकारण्यांच्यापेक्षा लोकांसाठी झटणारी समाजरत्ने समाजासमोर झळकली पाहिजेत-प्रकाश आबिटकरमॅनेजमेंटसाठी पाच अर्ज वैध, भाटियांचा अर्ज अवैध ! हंगेरगीकरांच्या उमेदवारीला सुटाचा आक्षेप !कर्करोग उपचारांसाठी चुंबकीय नॅनो कणांच्या निर्मितीसाठी पेटंट ! सरकारने गरिबांच्या शिक्षणाचे दायित्व निभवावे- पुरोगामीचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटीलप्रा. दत्ता जाधव यांना पीएचडीराष्ट्रीय स्तरावरील हँडबॉल स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाची दमदार कामगिरीव्यवसाय परवाना दरवाढीला व्यावसायिकांचा विरोध ! महापालिका अन् चेंबर ऑफ कॉमर्स आमनेसामने !!बुधवारपासून चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धा, सर्वाधिक बक्षीसाची स्पर्धा शिवाजी विद्यापीठ मॅनेजमेंट कौन्सिलच्या दोन जागेसाठी सहा अर्जदूध विक्रीत गोकुळचा नवा रेकॉर्ड ! कर्मचाऱ्यांनी केला चेअरमनांचा सत्कार

जाहिरात

 

पुण्या-मुंबईत गोकुळतर्फे नवे दोन प्रकल्प, एक एप्रिलपासून गाय दूध खरेदी दरात वाढ –हसन मुश्रीफ

schedule30 Mar 25 person by visibility 120 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘ मुंबई, पुणेसारख्या मोठया शहरात गोकुळच्या म्हैस दुधाची विक्री जास्त आहे. ग्राहकांकडून दूध पावडर, बटरला मागणी वाढत आहे. भविष्यकालीन विचार करुन पुणे आणि मुंबईत मिळून गोकुळचे दोन प्रकल्प सुरू करावे लागतील. पॅकिंग युनिटला या दोन्ही शहरातील प्रकल्पामध्ये जागा अपुरी पडत आहे. संचालकांनी नव्या प्रकल्प उभारणीची तयारी करावी.’असे आवाहन वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. याप्रसंगी मुश्रीफ यांनी, एक एप्रिल २०२५ पासून गाय दूध खरेदी दरात दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय संचालकांनी घेतला असल्याचे सांगितले.

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघातर्फे गोकुळ पेट्रोल पंप उद्घाटन सायलेज बेलर व हार्वेस्टर मशिनरी शुभारंभ आणि दूध उत्पादक व कर्मचाऱ्यांना बक्षीस वितरण असा संयुक्त समारंभ गुढीपाडव्याच्या दिनी आयोजित केला होता. गोकुळ शिरगाव येथील गोकुळ प्रकल्प येथे हा कार्यक्रम झाला. खासदार शाहू महाराज कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या कार्यक्रमात शंभरहून अधिक जणांचा सत्कार करण्यात आला. आमदार चंदद्रीप नरके, माजी आमदार के. पी. पाटील, संजय घाटगे यांची प्रमुख उपस्थित होती.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘अमूलला टक्कर देण्याची क्षमता गोकुळकडे आहे. येथील माती व पाण्याला वेगळी चव आहे. यामुळे उत्तम प्रतीच्या दुधाची निर्मिती होते. गोकुळच्या म्हैस दुधाला मोठी मागणी आहे. यासाठी म्हैस दूध संकलन वाढीसाठी प्रयत्नशील राहावे. पाच लाख  दूध उत्पादक शेतकरी आहेत. प्रत्येकाने म्हैस खरेदी करावी. म्हैस खरेदीला जिल्हा मध्यवर्ती बँक कर्ज देते. गोकुळकडून अनुदान मिळते. राज्याचा दुधाचा ब्रँड हा गोकुळ बनावा यासाठी सारे प्रयत्न करु या. दुग्ध व्यवसायात गोकुळ बँड हा देशात सर्वोत्कृष्ठ ठरावा.’

सोलापूर जिल्ह्यातील लिंबेवाडी येथे गोकुळने सोलर प्रकल्प उभारला आहे. एका महिन्याच्या कालावधीत ८६ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. ३३ कोटीचा हा प्रकल्प असून तीन वर्षात यामध्ये गुंतवलेल्या रकमेची परतफेड होईल.’ असेही मुश्रीफ म्हणाले.

चार वर्षात दूध खरेदी दरात अकरा रुपयांची वाढ

आमदार सतेज पाटील म्हणाले, ‘गोकुळमध्ये सत्ता परिवर्तन झाल्यापासून दूध उत्पादक हिताचा कारभार करत आहे. गेल्या चार वर्षात दूध खरेदी दरात अकरा रुपयांची दरवाढ केली. गोकुळला मिळणाऱ्या एक रुपया उत्पन्नातील ८५. ६८ पैसे इतका परतावा दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिला जातो. जिल्हा मध्यवर्ती बँक आणि गोकुळ दूध संघ या संस्था राजकारणविरहीत आहेत. यावर लाखो लोकांचे जीवन अवलंबून आहे. या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्याना, दूध उत्पादकांना न्याय देण्याची भूमिका आहे.’ खासदार शाहू महाराज यांनी गोकुळ दूध संघ हा साऱ्यांना बरोबर घेऊन वाटचाल करणारा संघ आहे. विविध पक्षाचे लोक येथे एकत्रितपणे शेतकऱ्यासाठी काम करत असल्याचे चित्र आहे.’

गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी प्रास्ताविकात विविध योजनांची माहिती दिली. गोकुळच्या हिरकमहोत्सवी वर्षानिमित्त दूध संस्थांना जाजम व घडयाळाचे वाटप करण्यात येणार असल्याची घोषणा चेअरमन डोंगळे यांनी केली. कार्यक्रमाला  गोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, संचालक अभिजीत तायशेटे, अजित नरके, किसन चौगले, चेतन नरके, अंबरिश घाटगे, बाळासाहेब खाडे, अमरसिंह पाटील, करणसिंह गायकवाड, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, बाबासाहेब चौगले, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, बयाजी शेळके, अंजना रेडेकर,, युवराज पाटील, राजेंद्र मोरे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भैय्या माने, स्मिता गवळी, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, बाजार समितीचे संचालक सुयोग वाडकर, माणिक पाटील चुयेकर, बाबासाहेब देवकर, गोकुळचे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले आदी उपस्थित होते. संचालक शशिकांत पाटील चुयेकर यांनी आभार मानले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes