जिल्हा नियोजन समितीमधून दुग्ध व्यवसायासाठी निधी राखीव ठेवावा-गोकुळची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
schedule29 Mar 25 person by visibility 52 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : जिल्हा नियोजन समितीच्या निधीमध्ये दुग्ध व्यवसायासाठी काही निधी राखीव ठेवावा अशी मागणी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या संचालकांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे केली.
जिल्हाधिकारी येडगे, करवीर उपविभागीय अधिकारी हरिष धार्मिक, करवीरचे तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी गोकुळ शिरगाव येथील गोकुळ दूध प्रकल्प येथे सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी गोकुळ परिवारातर्फे संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते व संचालक यांच्या उपस्थितीमध्ये गोकुळ प्रधान कार्यालय येथे त्यांचा सत्कार करण्यात आला.
जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले, ‘दुग्धव्यवसायाच्या माध्यमातून जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे काम गोकुळने केले. जिल्ह्यामध्ये दुग्ध व्यवसायाद्वारे शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी भरीव काम आहे. कोल्हापूरची भौगोलिक स्थिती येथील हवामान व पोषक वैरण यामुळे जिल्ह्यातील दुधाला चांगली चव आहे. ही चव व गुणवत्ता जपत गोकुळने ग्राहकांना दर्जेदार दूध व दुग्धजन्य पदार्थ उपलब्ध करून दिले आहेत हे निश्चितच कौतुकास्पद आहे.
यावेळी गोकुळ राबवत असलेल्या वासरू संगोपन योजना, जनावरांच्या आयुर्वेदिक उपचार पद्धतीचे व बायोगॅस, स्लरी योजनेचे त्यांनी खास कौतुक केले. कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले यांनी संघाची माहिती दिली. संचालक अजित नरके यांनी आभार मानले.
याप्रसंगी संचालक बाळासाहेब खाडे, बयाजी शेळके, डेअरी महाव्यवस्थापक अनिल चौधरी, शाकीर पाटील, मंडल अधिकारी उदय लांबोरे, शिवराज देसाई, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील, अरविंद जोशी, व्यवस्थापक प्रशासन रामकृष्ण पाटील, प्रकाश आडनाईक, हणमंत पाटील, बाजीराव राणे उपस्थित होते.