Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
राजकारण्यांच्यापेक्षा लोकांसाठी झटणारी समाजरत्ने समाजासमोर झळकली पाहिजेत-प्रकाश आबिटकरमॅनेजमेंटसाठी पाच अर्ज वैध, भाटियांचा अर्ज अवैध ! हंगेरगीकरांच्या उमेदवारीला सुटाचा आक्षेप !कर्करोग उपचारांसाठी चुंबकीय नॅनो कणांच्या निर्मितीसाठी पेटंट ! सरकारने गरिबांच्या शिक्षणाचे दायित्व निभवावे- पुरोगामीचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटीलप्रा. दत्ता जाधव यांना पीएचडीराष्ट्रीय स्तरावरील हँडबॉल स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाची दमदार कामगिरीव्यवसाय परवाना दरवाढीला व्यावसायिकांचा विरोध ! महापालिका अन् चेंबर ऑफ कॉमर्स आमनेसामने !!बुधवारपासून चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धा, सर्वाधिक बक्षीसाची स्पर्धा शिवाजी विद्यापीठ मॅनेजमेंट कौन्सिलच्या दोन जागेसाठी सहा अर्जदूध विक्रीत गोकुळचा नवा रेकॉर्ड ! कर्मचाऱ्यांनी केला चेअरमनांचा सत्कार

जाहिरात

 

कोल्हापुरात एक मार्चपासून फळ महोत्सव, तृणधान्येही उपलब्ध !

schedule26 Feb 25 person by visibility 231 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :  महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, विभागीय कार्यालय, कोल्हापूरतर्फे एक ते पाच मार्च २०२५ या कालावधीमध्ये 'मिलेट व फळ महोत्सव-२०२५' चे आयोजन केले आहे. अशी माहिती माहिती कृषि पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले यांनी दिली आहे. ताराराणी विद्यापीठ परिसरातील डॉ. व्ही. टी. पाटील स्मृतीभवन येथे महोत्सव होत आहे. आहे.

या मिलेट व फळ महोत्सवाचे उद्धघाटन शनिवारी (१ मार्च )  सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरिक्षक सुनिल फुलारी, कोल्हापूर महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, कृषि पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम, सरव्यवस्थापक विनायक कोकरे सहकारी संस्थाचे विभागीय सहनिबंधक महेश कदम, जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे, विभागीय कृषि सहसंचालक उमेश पाटील, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी जालिंदर पांगारे हे उपस्थित राहणार आहेत.

'उत्पादक ते ग्राहक थेट विक्री' या संकल्पनेतर्गत महोत्सव होत आहे. यंदाच्या महोत्सवात राज्याच्या विविध भागातून तृणधान्य उत्पादक, तृणधान्य प्रक्रियेमध्ये काम करणारे बचत गट, सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या, स्टार्टअप कंपन्या व सांगली जिल्ह्यातील द्राक्षे उत्पादक शेतकरी सहभागी होणार आहेत. महोत्सवामध्ये ४० स्टॉल असतील, ग्राहकांना अस्सल ज्वारी, बाजरी, नाचणी, भगर, राळा, सामा, कोद्रा ही तृणधान्ये व यापासून तयार करण्यात आलेला ज्वारीचा रवा, बाजरीच्या लाह्या, रागीची बिस्किटे, ज्वारीचे इडली-मिक्स, रागीचा डोसा मिक्स इत्यादी नाविण्यपूर्ण अशी असंख्य प्रकारची उत्पादने व द्राक्षे थेट उत्पादकांकडून विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत.  करवीरवासियांनी उपस्थित राहून मिलेट व फळ महोत्सवास भेट देण्याचे आवाहन कृषि पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक घुले यांनी केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes