कोल्हापूर एसटी विभागात पाच नवीन बसेस दाखल
schedule24 Mar 25 person by visibility 110 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागात पाच नवीन एसटी गाडया दाखल झाल्या. आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते त्यांचे पूजन झाले. नवीन गाडयांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी प्रवाशांना साखर-पेढे वाटप केले. दरम्यान आमदार महाडिक यांनी, ‘कोल्हापूर विभागास आणखी २५गाडया देण्याबाबत वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.’असे सांगितले. या नवीन गाडया बीएस सहा इंजिन प्रकारातील आहेत. प्रवाशांसाठी आरामदायी पुशबॅक आसन, चार्जर यंत्रणा, न्यूमॅटिक दरवाजायुक्त् आहेत. या गाडयांच्या लोकार्पणप्रसंगी विभाग नियंत्रक शिवराज जाधव, यंत्रअभियंता यशवंत कानतोडे, विभागीय वाहतुक अधिकारी संतोष बोगरे, अतुल मोरे, लेखाधिकारी मानिनी तेलवेकर, विभागीय अभियंता सुरेश मोहिते, गीता सुर्यवंशी, आगार व्यवस्थापक अनिल म्हेतर, प्रमोद तेलवेकर, स्थानकप्रमुख मल्लेश विभुते, संकेत जोशी, विजय निगडे, राम पोळ, वाहतूक निरीक्षक अनिल सुतार सारंग जाधव आदी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहायक वाहतूक निरीक्षक दिपक घारगे, लिपीक शेखर सुर्वे, अमित तावडे, वाहतूक नियंत्रक इरफान सांगावकर, यांनी परीश्रम घेतले.