विन्सचे विस्तारीकरण, २२० बेडसचे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल ! मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गुरुवारी उद्घाटन !!
schedule04 Mar 25 person by visibility 235 categoryआरोग्य

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : गेली ६५ वर्षे वैद्यकीय क्षेत्रात अग्रेसर असणारे आणि अखंडितपणे रुग्णसेवा देणारे विन्स हॉस्पिटल आता अधिक सुसज्ज आणि विस्तारित मल्टीस्पेशालिटी सुविधांसह तयार आहे. या नव्या सुसज्ज इमारतीचे उद्घाटन गुरुवारी, ६ मार्च २०२५ रोजी, सायंकाळी चार वाजता होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होत आहे अशी माहिती न्यूरोसर्जन डॉ. संतोष प्रभू आणि डॉ. सुजाता प्रभू यांनी दिली. उद्घाटन समारंभास जिल्ह्यातील खासदार-आमदार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
हॉस्पिटलविषयी बोलताना डॉ. प्रभू म्हणाले, ‘ या नव्या इमारतीत २२० सर्व सोयींनीयुक्त बेड्स असलेले अत्याधुनिक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यात आले आहे. येथे आंतररुग्ण चिकित्सा,क्रिटिकल केअर, अॅडव्हान्स अॅक्सिडेंट आणि ट्रॉमा केअर, इमर्जन्सी मेडिसिन ट्रामा, हृदयरोग आणि हृदयरोग शस्त्रक्रिया, त्वचारोग, प्लास्टिक, एस्थेटिक आणि पुनर्रचना शस्त्रक्रिया,एन्डोस्कोपिक स्पाइन सर्जरी होतील. इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी, न्यूरोसर्जरी, जनरल आणि लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी, किडनी विकार, मूत्र विकार, प्रसूती व स्त्रीरोगशास्त्र, ऑर्थोपेडिक्स, बालरोग, कॅन्सरसह जोखमीच्या व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया अशा विविध विभागांसह तज्ञ डॉक्टरांची पूर्णवेळ उपलब्धता असणार आहे. एकाच छताखाली जागतिक दर्जाच्या वैद्यकीय सेवा आणि सुविधा पुरवणारे हे हॉस्पिटल रुग्णांच्या सेवेसाठी सुसज्ज आहे.
या हॉस्पिटलमध्ये विविध विकारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांची तपासणी, निदान आणि अत्याधुनिक उपचारांसह एआय टेलिमेडिसीन व भविष्यकाळात रोबोटिक शस्त्रक्रिया, अवयव प्रत्यारोपन शस्त्रक्रिया यांसारख्या आधुनिक सुविध आहेत. या रुग्णालयाचे व्यवस्थापन डॉ.व्यकंट होळसंबरे, सीईओ संदीप वनमाळी आणि त्यांच्या टीमकडे आहे. पत्रकार परिषदेस न्यूरोसर्जन डॉ. आकाश प्रभू, डॉ. डीओना प्रभू,डॉ. संदीप पाटील, व्यंकट होळसंबे, संदीप वनमाळी, चिन्मय ठक्कर, दामोदर घोलकर आदी उपस्थित होते.