जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशन अध्यक्षपदी डॉ.वर्षा पाटील,सचिवपदी राजेश सोनवणे
schedule24 Mar 25 person by visibility 108 categoryआरोग्य

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. वर्षा पाटील, सचिव पदी डॉ.राजेश सोनवणे, खजानिस पदी डॉ. दीपक पवार यांची निवड करण्यात आली. २०२५-२६ या वर्षासाठी या निवडी आहेत. असोसिएशनची वार्षि सभा नुकतीच झाली.
संस्थेचे सचिव डॉ. महादेव जोगदंडे यांनी २०२४-२५ या वर्षाचा अहवाल सादर केला. खजानिस डॉ.गुणाजी नलवडे यांनी लेखाजोखा मांडला. असोसिएशनचे मावळते अध्यक्ष डॉ. अरुण धुमाळे यांनी वर्षभराच्या कामगिरीविषयी आढावा मांडला. त्यानंतर निवड समितीच्या अध्यक्षा डॉ. शुभांगी पार्टे यांनी नवीन कार्यकारिणी घोषित केली.
कार्यकारिणीत डॉ. शिवराज जितकर, डॉ. विनायक शिंदे, डॉ.गुणाजी नलवडे, डॉ.महादेव जोगदंडे, डॉ. उषा निंबाळकर,डॉ.प्रशांत खुटाळे, डॉ. शशिकांत पाटील, डॉ. अनिल कवठेकर, डॉ. सुधाकर ढेकळे,माजी अध्यक्ष डॉ.अरुण धुमाळे,तज्ञ सल्लागार संचालक पदी डॉ. शुभांगी पार्टे,डॉ. रमेश जाधव,डॉ. शिवाजी मगदूम. संस्थापक अध्यक्ष डॉ.विनोद घोटगे आहेत. वार्षिक सभेला डॉ. उद्यम वोरा, डॉ विलास महाजन, डॉ. शिवराज देसाई, डॉ. शीतल पाटील, डॉ. चंद्रकांत सोनवणे, डॉ. किशोर निंबाळकर, डॉ. हरीश नांगरे, डॉ. राजेश सातपुते उपस्थित होते.