शिवाजी विद्यापीठ कर्मचारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी दिपक काशीद, उपाध्यक्षपदी राकेश डोंगरे
schedule08 Apr 26 person by visibility 27 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी दिपक नारायण काशीद यांची, तर उपाध्यक्षपदी राकेश आण्णासो डोंगरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी निलेश दिनकर पाटील (सहकारी अधिकारी श्रेणी- २ अधिन, उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर शहर) यांच्या अध्यक्षतेखाली निवड करण्यात आली. या बैठकीला संचालक विजय पाटील, राजेंद्र चव्हाण, साताप्पा साळोखे, अनिल साळोखे, सचिन नाळे, विजय इंगवले, शशिकांत साळुंखे, सागर चौरे, विनय पाटील, सागर लांडे, सुरेश पाटील, शितल सरनाईक, वंदना गुरव, चिटणीस नितीन लोहार व संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते.