Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
ङङक्षथछ ततग्रामीण जीवन समृद्ध करण्यात आनंदराव पाटील -चुयेकरांचा मोठा वाटा : चेअरमन नविद मुश्रीफ    सीईओंकडून विभागांची अचानक पाहणी! अधिकाऱ्यांना सूचना, कर्मचाऱ्यांची उडाली धांदल !!ग्रामीण भागातील डॉक्टरांचा केडीजीपीएतर्फे सन्मान, रविवारी पुरस्कार वितरण समारंभप्राथमिक शिक्षक बँकेला तीन कोटी सहा लाख निव्वळ नफा : अध्यक्षा वर्षा शरद केनवडेराज्यातील मान्यप्राप्त खाजगी प्राथमिक शाळांचे वेतनेतर अनुदान घ्या : राजेंद्र कोरेएकाच विषयावर फोकस नाही, ग्रामीण भागाचा सर्वांगिण विकास हाच अजेंडा - सीईओ डॉ. जस्मिनसतेज पाटलांचा वाढदिवस होणार लोकोत्सव, दहा लाख वह्या संकलनाचे उद्दिष्ट पदोन्नतीच्या फरकाची रक्कम जमा, प्राध्यापक महासंघातर्फे अधिकाऱ्यांचा सत्कारभाजपाचा वर्धापनदिन, सिनीअर कार्यकर्त्यांचा सन्मान अन् २०२९ च्या निवडणुकीसाठी तयारीचे आवाहन

जाहिरात

 

सीईओंकडून विभागांची अचानक पाहणी! अधिकाऱ्यांना सूचना, कर्मचाऱ्यांची उडाली धांदल !!

schedule07 Apr 26 person by visibility 279 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जस्मिन यांनी मुख्यालयातील विविध विभागांना मंगळवारी, ( सात एप्रिल २०२६) भेटी दिल्या.सामान्य प्रशासन विभाग, ग्रामपंचायत विभाग, आरोग्य विभाग, कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग, बांधकाम विभाग, वित्त विभाग, शिक्षण विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, पाणी व स्वच्छता विभाग पाहणी केली. सीईओंनी अचानक तपासणी सुरू केल्यामुळे कर्मचाऱ्यांची धांदल उडाली. काही कर्मचारी कार्यालयाबाहेर होते, त्यांनी धावतपळत कार्यालय गाठले. दरम्यान सीईओंच्या कार्यालयानी पाहणीवेळी आरोग्य विभागातील प्रशासनाधिकारी कार्यालयात उपस्थित नव्हते. त्या संदर्भातही त्यांनी अधिकाऱ्यांकडे विचारणा केली. जे अनुपस्थित आहेत, त्यांना कारणे दाखवा नोटीस लागू करा अशा सूचना केल्या.

डॉ. जस्मिन यांनी, विभागप्रमुखांनाही सूचना केल्या. विभागांचे नामफलक, सर्व कर्मचाऱ्यांचे कार्यविवरण आणि नस्ती यांची यादी लावणे, कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत हजर राहणे आणि ओळखपत्र वापरण्याबाबत, अनावश्यक फाईल्सचे गठठे अभिलेख कक्षात वर्ग करणे, हालचाल रजिस्टर नोंद करणे, कार्यालयीन साफसफाई करणे याबाबत सूचना केल्या. अनुपस्थित कर्मचारी यांना कारणे दाखवा नोटीस लागू करा असेही सांगितले. राजर्षी छत्रपती शाहू सभागृहाला भेट देवून पाहणी केली. यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, मुख्य लेखा व वित्‌त अधिकारी अतुल आकुर्डे, ग्रामीण पाणी पुरवठाचे अर्जुन गोळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती माधुरी परीट आदी खातेप्रमुख उपस्थित होते.
 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes