समरजितसिंह घाटगेंची भाजपमध्ये पुन्हा वापसी !- आता कुठलेही प्रयोग करायचे नाहीत, जे पक्ष सांगेल ते काम करणार! !
schedule08 Apr 26 person by visibility 136 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन : विधानसभेच्या २०२४ मधील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा झेंडा हाती घेणारे शाहू ग्रुपचे प्रमुख समरजितसिंह घाटगे यांची भारतीय जनता पक्षात पुन्हा घरवापसी झाली. भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार प्रकाश आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये घाटगे यांनी कार्यकर्त्यांसह मुंबईत कमळ हाती घेतले. प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी घाटगे व त्यांच्या कार्यकर्त्यांचे स्वागत केले. ‘घाटगे यांच्या प्रवेशामुळे पक्षाची ताकत वाढली आहे. त्यांचा योग्य सन्मान राखला जाईल. ते ज्या विश्वासाने पक्षात दाखल झाले आहेत, त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही.’अशी ग्वाही दिली. शाहू ग्रुपचे प्रमुख समरजितसिंह घाटगे म्हणाले, ‘भारतीय जनता पक्षात गेल्यावर्षीच प्रवेश करायचा निर्णय झाला होता. आतापर्यंत काही प्रयोग केले, येथून पुढे आता कोणताही प्रयोग करायचा नाही. प्रयोगाला आता स्कोप नाही. पक्ष म्हणून भाजप जे काम सांगेल, जी जबाबदारी सोपवेल ती साऱ्यांनी मिळून नेटाने पार पाडायची आहे.’असे त्यांनी कार्यकर्त्यांनी आश्वस्त केले.