Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
णण तततएलआयसीचे निवृत्त अधिकारी नंदकुमार जाधव यांचे निधन हरिप्रिया एक्स्प्रेसमधील कमी केलेल्या प्रवासी डब्यांची संख्या पूर्ववत करा- परिवहन समिती सभापती सत्यजित जाधव ॲक्शन मोडवर, वर्कशॉपची केली पाहणी डीवाय पाटील अभियांत्रिकीच्या  माजी विद्यार्थ्याचे यूपीएससीमध्ये यशमहापालिकेसमोर काँग्रेसचे आंदोलन, भाजपच्या मंत्र्यांनी दिली प्रश्नांच्या सोडवणुकीची ग्वाहीकोल्हापुरात शनिवारी - रविवारी कंदमुळांचा महोत्सवसतेज पाटलांशी हातमिळवणी ही तर अफवाच, जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष महायुतीचाच - हसन मुश्रीफ एकनिष्ठेचे फळ ! गोल्डनमॅनच्या चिरंजीवला मिळाली सभापतिपदाची संधी ! !गोकुळमधील बोगस सभासदांना दिलासा नाही-प्रकाश बेलवाडेंची माहिती

जाहिरात

 

महापालिकेसमोर काँग्रेसचे आंदोलन, भाजपच्या मंत्र्यांनी दिली प्रश्नांच्या सोडवणुकीची ग्वाही

schedule12 Mar 26 person by visibility 76 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेचा सुधारित आकृतीबंध व  सेवा नियमावली मंजूर करावी यासाठी काँग्रेस आघाडीने उपोषणाचे अस्त्र उपसले. काँग्रेसच्या नगरसेवकांनी महापालिकेसमोर गुरुवारी, बारा मार्च 2026 पासून उपोषण करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसच्या नगरसेवकांनी मागण्यांचे निवेदन महापौर रुपाराणी  निकम यांनाही दिले. दरम्यान महापालिकेची सेवानियमावली व फेरीवाला धोरण संबंधी सरकार सकारात्मक असून येत्या काही दिवसात या विषयाची सोडवणूक केली जाईल असे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापौर निकम यांना फोनवरुन कळविले. महापौरांनी, आंदोलनस्थळी पुन्हा भेट देऊन मंत्री पाटील यांचा निरोप काँग्रेसच्या नगरसेवकांनी कळविला. सरकार सकारात्मक असून आंदोलन करण्याची गरज नसल्याचे महापौरांनी सांगितले.

 ‘महापालिका हिताचा व कर्मचारी भरतीच्या विषयाची सोडवणूक व्हावी ही साऱ्यांची भावना आहे. ३१ मार्च २०२६ पर्यत आम्ही सरकारक काय निर्णय घेणार ते पाहू. अन्यथा आंदोलनाची पुढील दिशा ठरविली जाईल.’असे महापालिकेतील विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांनी सायंकाळी स्पष्ट केले. महापालिकेमध्ये मोठ्या संख्येने जागा रिक्त झाले आहेत वर्ग श्रेणी एक पासून ते चतुर्थ श्रेणी पर्यंत जवळपास 1700 जागा भरायचे आहेत. या संदर्भात सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करूनही चाल दाखल केले जात आहे कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे महापालिकेच्या दैनंदिन कामकाजावरती परिणाम होत आहे. तसेच पायाभूत सुविधांची उपलब्धता करून देण्यावर मर्यादा पडत आहेत. सरकारने त्वरित महापालिकेचा सुधारित आकृतीबंध व सेवानियमावलीला मंजुरी द्यावी यासाठी काँग्रेसने आंदोलन सुरू केले आहे. दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी 48 तासाची मुदत सरकारकडे दिली होती. मात्र या कालावधीत सरकारकडून कोणत्याही हालचाली झाल्या नाहीत असा आक्षेप नोंदवत काँग्रेसच्या नगरसेवकांनी आंदोलन सुरू केले.

आंदोलनात विरोधी पक्षनेते लाटकर, गटनेते इंद्रजीत बोंद्रे, नगरसेवक दुर्वास कदम, अमर समर्थ, उमेश पोवार, सचिन शेंडे,  विनायक फाळके, सुभाष बुचडे, स्वालिया बागवान, दिलशाद मुल्ला, मुस्ताक मलबारी,  प्रवीण सोनवणे, राहुल माने ,  स्वाती सचिन कांबळे, दिपाली राजेश घाटगे, विशाल चव्हाण, आदींचा समावेश आहे. माजी महापौर व राष्ट्वादीचे शहराध्यक्ष आर के पोवार, शिवसेनेचे सह संपर्कप्रमुख विजय देवणे, माजी नगरसेविका भारती पोवार,माजी नगरसेवक दिलीप शेटे, लाला भोसले, विजय सूर्यवंशी,  शशिकांत पाटील, संपतराव पाटील, रियाज कागदी, कॉमे्रड दिलीप पवार, अशोक पोवार, सुभाष देसाई आदीनी आंदोलनाला पाठिंबा दिला.

………………………...........

साखळी उपोषण ठरले एकदिवसीय आंदोलन

महापालिकेचा सुधारित आकृतीबंध, फेरीवाला धोरण व सुधारित नियमावलीला मंजुरी यासाठी काँग्रेसच्या नगरसेवकांनी, ‘महापालिकेसमोर १२ मार्चपासून साखळी उपोषण करण्यात येईल’ असे पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले होते. त्यानुसा गुरुवारी दिवसभर महापालिकेसमोर आंदोलन केले. दरम्यान सायंकाळी आंदोलन थांबविले. त्यावरुन महापालिका चौकात, ‘इशारा दिला साखळी उपोषणचा  आणि आंदोलन केले एकदिवसीय’अशी चर्चा रंगली. दरम्यान मंत्री महोदय, महापौर व अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून याविषयी लवकरच सकारात्मक होणार असल्याची ग्वाही मिळाली. गटतट, पक्षीय राजकारण न पाहता हा विषय सुटला पाहिजे अशी आमची भूमिका असल्याचे नगरसेवकांनी सांगितले. त्याचवेळी हा विषय नगरविकास खात्याशी निगडीत आहे. आणि नगरसेवक खाते हे शिवसेनेकडे आहे. याकडेही काही जणांनी लक्ष वेधले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes