Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
दिवाळीनंतर नागपूर, गोवा, दिल्ली, राजस्थान अन् गुजरातसाठी विमानसेवा - धनंजय महाडिकशाहूवाडीच्या एमआयडीतील गुंतवणुकीसाठी आमदार विनय कोरेंनी घातली कोल्हापुरातील उद्योजकांना सादडीवाय पाटील अभिमत विद्यापीठ देशात नवव्या ! राज्यात तिसऱ्या स्थानी,नवी दिल्लीत सन्मान !!कृष्णराज महाडिक यांच्या युवाशक्ती जागर यात्रेचे सिंधुदुर्गमध्ये जल्लोषी स्वागतन्यू कॉलेजची विद्यार्थिनी श्रेया गुरवला तीस हजाराची शिष्यवृत्तीन्याय- बंधुता - समता या त्रिसूत्रीवर काम करणार - जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोडशिवसेनेतील निष्ठावंताना विविध नियुक्त्या, पदांच्या माध्यमातून न्याय द्यावाश्री स्वामी समर्थांच्या जीवनावर रॅपसाँग, २४ मे रोजी कोल्हापुरात लॉन्चिंग !आयर्विन ख्रिश्चन मैदानावर कोल्हापूरकरांना पाहायला मिळणार अवतारनगरीप्रस्तावित आयटी पार्कास छत्रपती ताराराणी यांचे नाव द्या, आमदार क्षीरसागरांची उद्योगमंत्र्यांच्याकडे मागणी

जाहिरात

 

कोल्हापुरात शनिवारी - रविवारी कंदमुळांचा महोत्सव

schedule12 Mar 26 person by visibility 430 categoryलाइफस्टाइल

 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर  :  "कोल्हापूर वुई केअर "आणि "एनजीओ कम्पॅशन २४" ह्या संस्थेच्या आयोजनातून 14 व 15 मार्च 2026 या कालावधीत 250 हून अधिक कंदमुळाचे  प्रदर्शन आयोजित केले आहे.  अशी माहिती संयोजक प्राचार्य मधुकर बाचुळकर व मिलिंद धोंड यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्था,गार्डन्स क्लब ,युथ ऍनेक्स , वुई केअर हेल्पलाईन या संस्थांच्या सहकार्याने  कंदमुळांचे माहितीपूर्ण शास्त्रीय प्रदर्शन  शहाजी कॉलेजच्या यशवंतराव चव्हाण सभागृह,दसरा चौक येथे आयोजित करण्यात आले आहे.

ह्या प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवारी १४ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, कोल्हापूरच्या प्रथम नागरिक महापौर रुपाराणी निकम, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे, शाहू एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मानसिंग बोंद्रे, शहाजी कॉलेजचे प्राचार्य डॉ.आर. के. शानेदिवाण, मुद्रांक जिल्हाधिकारी बाबासाहेब वाघमोडे, सिद्धगिरी नर्सरीचे सतीश कुलकर्णी यांच्या विशेष उपस्थितीत प्रदर्शनाचा सोहळा पार पडणार आहे. अशी माहिती वुई केअरचे प्रमुख धोंड यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
    लोकांना कंदमुळांची ओळख आणि चांगली माहिती मिळावी म्हणून मोहन माने यांच्या प्रयत्नातून हे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे.  प्रदर्शनात कणगा ,काटे कणंग ,कोराडू ,करांदा, वराहकंद ,वासकंद ,पासपोळी , शेंडवेल ,कडुकंद, आळसी ,शेवळा , सुरण ह्या वनस्पतींची कंदमुळे , हवाई बटाटे, कंदीका आणि कंदक तसेच मोठा कासार अळू ,काळा अळू ,हिरवा अळू ,पांढरा पेरव , उंडे ,शेडवाळे असे अळुंचे विविध प्रकार आणि त्यांचे कंद , त्याचबरोबर काळी हळद ,आंबेहळद , रानहळद ह्या सारखे हळदीचे विविध प्रकार व त्यांचे कंद  तसेच अमेरिकन अळू, चिनी बटाटे इ.विदेशी कंदमुळे अशाप्रकारच्या सुमारे २५०  हुन अधिक प्रकारच्या कंदाच्या जाती, प्रजातींची मांडणी ह्या प्रदर्शनात केली जाणार आहे. असे  बाचुळकर यांनी सांगितले.
     कंदमुळांपासून विविध खाद्यपदार्थ कसे बनविले जातात, त्याच्या पाककृती या प्रदर्शनात पाहता येतील. तसेच या पदार्थांची चवही चाखता यावी यासाठी हे खाद्यपदार्थ खाण्यासाठी उपलब्ध असतील. काही कंदमुळे विक्रीसाठी ही असतील.  रानभाज्या, वृक्ष आणि औषधी वनस्पतींची माहिती असणारी पुस्तके  विक्रीसाठी येथे उपलब्ध असतील.
प्रदर्शनात ठेवण्यात येणाऱ्या कंदांचे संकलन प्रामुख्याने कर्नाटकातील जोयडा,म्हैसूर,मंगळूर ,महाराष्ट्रातील बेल्हे ,नाशिक, मुरबाड, पालघर व गगनबावडा   तसेच ओरिसा राज्यातील भुवनेश्वर आणि तामिळनाडू राज्यातील कोईमतूर, सेलम, वेल्लूर आणि केरळ राज्यातील वायनाड  भागातून आणली आहेत. हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले  आहे.वेळ सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत असेल. प्रदर्शनाचे प्रोजेक्ट चेअरमन सुशांत टक्कळकी असून को चेअरमन अमृता वासुदेवन आहेत . पत्रकार परिषदेस प्राचार्य डॉ.अशोक वाली, कंदमुळांचे अभ्यासक मोहन माने, गार्डन्स क्लबच्या अध्यक्षा पल्लवी कुलकर्णी, अभिजीत पाटील, राजू तेली आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes