Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
स्वातंत्र्यदिनापासून धावणार ई बसेस ! कोल्हापुरात होणार सिमेंटचे रस्ते !! कोल्हापूर जिल्ह्यातील २५१ गावांना ७६ कोटी मंजूरमहापुराच्या उपाययोजनेसंबंधी दोन खासदार, सात आमदारांचे जलसंपदामंत्र्यांना पत्रऋतुराज पाटील यांच्यावर वाढदिवसानिमित शुभेच्छाचा वर्षावगोकुळची निवडणूक महायुती म्हणून लढणार, मंत्री मुश्रीफ आमच्या सोबत असतील - धनंजय महाडिकवडिलांना मिठी मारताच नवीद मुश्रीफ झाले भावूककोल्हापूर महानगर भाजप अध्यक्षपदी विजय जाधवस्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी इंडिया आघाडी सरसावली, नेतेमंडळीची पदाधिकाऱ्यांच्यासोबत संयुक्त बैठक जागतिक स्तरावरील कॅन्सर उपचार आता कोल्हापुरात !णणजझ त

जाहिरात

 

अध्यक्ष महायुती की महाविकासचा ? नविद मुश्रीफ म्हणाले, गोकुळात हम सब एक है, सहकार हा आमचा धर्म !

schedule30 May 25 person by visibility 239 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राजकीय घडामोडीमुळे  गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाची निवड लक्षवेधी ठरली.अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर नविद मुश्रीफ यांना  पत्रकारांनी, ‘गोकुळचा अध्यक्ष महायुतीचा झाला की महाविकासचा ? अशी विचारणा केली. त्यावर नूतन अध्यक्ष मुश्रीफ म्हणाले, ‘हम सब एक है” असे उत्तर दिले.  त्याचवेळी त्यांनी राजर्षी शाहू शेतकरी परिवर्तन आघाडीची आठवण करुन दिली.

 मी गट-तटाच्या पलीकडे जाऊन, "सहकार हा आमचा धर्म" या मूल्याशी प्रामाणिक राहून कार्य करीन. गोकुळ ही संस्था सर्वांसाठी खुली, उत्तरदायी आणि सर्वसमावेशक राहील, यासाठी मी कटिबद्ध आहे. माझी ही निवड ही केवळ माझी नाही, तर आपणा सर्वांच्या विश्वासाची आणि एकतेची निवड असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान  नूतन चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले, गोकुळ दूध संघाच्या चेअरमनपदी माझी एकमताने निवड करून जो विश्वास माझ्यावर दाखवण्यात आला आहे. त्याबद्दल मी शाहू आघाडीचे सर्व नेते मंडळी, माझे सहकारी संचालक मंडळ तसेच माझ्या शेतकरी बांधवांचे मनपूर्वक आभार मानतो. मी भविष्यात काम करत असताना दूध उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दूध दर देण्यासाठी कटिबद्ध असून दूध संकलन, प्रक्रिया आणि विक्री व्यवस्था अधिक पारदर्शक व कार्यक्षम राबूवन नव्या तंत्रज्ञानाचा व्यवस्थापन प्रणालींचा समावेश करून  गोकुळची  गुणवत्ता आणि ब्रँडची विश्वासार्हता राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर नेणार आहे. तसेच या दुग्ध व्यवसायामध्ये महिला व युवा शेतकरी  अधिक सक्रीय होण्यासाठी त्यांना गोकुळमार्फत प्रोत्साहन देऊ.

 गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्याची वाढती मागणी लक्षात घेता येत्या नजीकच्या काळात गडमुडशिंगी येथे टीएमआर प्लाँट विस्तारीकरण व पशुखाद्य कारखान्याचे नूतनीकरण करण्याचे नियोजन आहे. तसेच मुंबई, पुणे येथील दूध उत्पादनाची मागणी लक्षात घेता नवी मुंबई वाशी येथे उभारणी  केलेल्या १५ मे.टन क्षमतेचा दही प्रकल्प लवकरच कार्यान्वित करणार आहे. गायी- म्हैशींच्या गाभण कालावधीच्या शेवटच्या दोन महिन्यासाठी आवश्यक प्रेग्नेसी रेशनचे उत्पादन (पशुखाद्य) घेणेचे नियोजन आहे. नवीन दुग्धजन्य उत्पादनांची निर्मिती व मार्केट विस्तार या सारखे संघ हिताचे निर्णय सर्वांच्या सहकार्याने घेणार आहे.’असे म्हणाले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes