ब्राह्मण सभा करवीर मंगलधामच्या श्रीराम कथा - निरूपण सोहळ्याची सांगता
schedule28 Jun 26 person by visibility 25 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर: ब्राह्मण सभा करवीर मंगलधामतर्फे गेले आठवडाभर सुरू असलेल्या श्रीराम कथा - निरूपण सोहळ्याची सांगता रविवारी राम गणेश गडकरी सभागृह येथे झाली. रविवारी, श्रीराम राज्याभिषेक या कथेचे निरूपण करण्यात आले. नागरिकांनी,श्री रामाचा जयजयकार केला. निरुपणकार मकरंद सुमंत रामदासी यांचे गेल्या आठवडाभर रामायण कथेचे निरूपण सुरू होते. ब्राह्मण सभा करवीर मंगलधामचे अध्यक्ष डॉ. दीपक आंबर्डेकर तसेच महालक्ष्मी अन्नछत्र चे राजू मेवेकरी, उपाध्यक्ष किरण धर्माधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीराम मूर्तीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर भक्तांसाठी प्रसाद वाटप करण्यात आले. त्याचा भाविकांनी लाभ घेतला. यावेळी ब्राह्मण सभा करवीरचे अध्यक्ष डॉ. दीपक आंबर्डेकर, उपाध्यक्ष किरण धर्माधिकारी, कार्यवाह श्रीकांत लिमये, नंदकुमार मराठे, प्रसाद खाडीलकर, संतोष कोडोलीकर, अशोक जोशी, रामचंद्र टोपकर, न्यू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विनोद कुमार लोहिया, विवेक शुक्ल, विनोद डिग्रजकर, पूजा जोशी, डॉ. उदय कुलकर्णी, ऍड. एन. ए. कुलकर्णी उपस्थित होते.