Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
शिवसेना ठाकरे पक्षाच्या युवा सेनेतर्फे शिक्षण मंत्र्यांच्या विरोधात आंदोलनसतेज पाटलांनी राजकारणात सभ्यता पाळावी, त्यांच्या विरोधात आमच्याकडेही व्हिडिओ - राजेश क्षीरसागरना मुहूर्त पाहतो, ना स्वत: श्रीफळ वाढवितो…अमावस्येला कामाला प्रारंभ, कर्मावर विश्वास ! संजय घोडावतांचा अनोखा बिझनेस फंडा !!बीएनआयच्या इंडस्ट्रियल मिक्सरमध्ये उलगडल्या उद्योजकांच्या सक्सेस कहाण्याकरवीर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत एआय तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देणार - सभापती साताप्पा पाटीलविना अनुदानित शाळांच्या टप्पा अनुदान आंदोलनास शैक्षणिक व्यासपीठाचा पाठिंबारविकिरण इंगवलेंचा राजेश क्षीरसागरांच्यावर आरोप, ऋतुराज क्षीरसागरांचा इंगवलेंच्यावर पलटवारवीरशैव बँकेला शेड्युल्ड बँकेचा दर्जा ! कोल्हापुरात रंगला आनंदोत्सव !!टीईटीचा पेपर फुटला, रविवारी होणारी परीक्षा रद्द !  शिक्षकांना धक्का !!मनसेची कोल्हापुरात पुनर्बांधणी, कार्यकर्त्यांशी थेट संवाद

जाहिरात

 

सतेज पाटलांनी राजकारणात सभ्यता पाळावी, त्यांच्या विरोधात आमच्याकडेही व्हिडिओ - राजेश क्षीरसागर

schedule28 Jun 26 person by visibility 116 category

 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : ' नगरपालिका, जिल्हा परिषदा, महापालिका या साऱ्या निवडणुकीमध्ये महायुतीने महाविकास आघाडी व काँग्रेसवर मात केली. विधानसभा निवडणुकीतच जिल्ह्यात दहाविरुद्ध शून्य असा जनतेने कौल दिला. यामुळे महाविकास आघाडीचे नेते नैराश्यात गेले आहेत. लोकांनी नाकारल्यामुळे ते जनतेत चर्चेत राहण्यासाठी खोटेनाटे आरोप करत आहेत आमदार सतेज पाटील यांनी राजकारणात सभ्यता पाळावी. बदनामीचे षडयंत्र थांबवून स्वतःच्या निष्क्रितेचे आत्मपरीक्षण करावे . काचेच्या महालात राहणाऱ्याने दुसऱ्याच्या घरावर दगड मारू नयेत. आमच्याकडेही त्यांच्या विरोधात व्हिडिओ आहेत. आमच्या विरोधात कोणी प्लॅन करत असेल तर आम्ही आता प्लॅन करू' असा इशारा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिला. सोशल मीडियावर गेले दोन दिवस माझ्या विरोधात फिरणारा व्हिडिओ हा बनावट आहे. आमदार पाटील यांनी महापालिकेच्या निवडणुकीच्या कालावधीत हाच व्हिडिओ माझ्या विरोधात प्रसारित केला होता.  यातील संबंधित व्यक्तीने माझ्याकडे लेखी पत्र दिले आहे असून हा व्हिडिओ बनावट व एडिटेड केल्याचे म्हटले आहे. वास्तविक कोल्हापूरच्या जनतेने माझ्यावर प्रचंड प्रेम केले आहे. तीनदा मला आमदार केले. माझी लोकप्रियता विरोधकांना बघवत नाही. म्हणून ते मला व माझ्या कुटुंबीयांच्या बदनामीचे षडयंत्र आखत असतात. मात्र आपण त्याला भीक घालत नाही. सोशल मीडियावर जो एडिट केलेला व्हिडिओ प्रसारित केला आहे त्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचेही आमदार क्षीरसागर यांनी सांगितले. माझ्या पाठीशी महायुतीची ताकद आहे. जनतेचे प्रेम आहे. कार्यकर्त्यांची साथ आहे, तेच माझे भांडवल आहे. माझ्याकडे मोठमोठ्या शैक्षणिक संस्था नाहीत. मोठ्या हॉस्पिटल नाहीत. आणि राजकारणातून जमवलेली प्रचंड माया सुद्धा नाही. असा टोलाही आमदार क्षीरसागर यांनी आमदार सतेज पाटील यांना लगावला. विधानसभा व महापालिका निवडणुकीत जनतेने त्यांना घरी बसवले आहे. नगरपालिका व जिल्हा परिषदेमध्ये ही महायुतीची सत्ता आली. आता गोकुळची निवडणूक सुद्धा महायुती जिंकणार आहे आमदार  क्षीरसागर यांनी सांगितले
 शिवसेनेच  ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख रविकरण इंगवले यांनी केलेल्या आरोपाबद्दल बोलताना आमदार क्षीरसागर म्हणाले, ' त्या ब्लॅकमेलरबद्दल मी काहीही बोलणार नाही.  ज्यांच्यावर 302 चा खटला आहे त्यांच्या विरोधात काय बोलायचे ? त्यांचा बोलविता धनी कोण आहे हे कोल्हापूरच्या जनतेला माहित आहे.' अशा शब्दात त्यांनी उत्तर दिले. राजकारणात  सभ्यता पाळायची असते. वैयक्तिक टीकाटिप्पणी टाळायचे असते.  कुटुंब व  मुलांना राजकारणात ओढू नये. माझ्या विरोधात प्लॅन करत असाल तर आम्हीही त्यांच्या विरोधातल्या प्लॅन करू. अनेकांच्या वैयक्तिक आणि त्यांच्या कुटुंबांच्या कुडल्या माझ्याकडे तयार आहेत.  आमदार सतेज पाटील यांनी राजकारणात सभ्यता पाळावी. काचेच्या महालात राहणार आणि दुसऱ्याच्या घरावर दगड मारू नयेत. वर्षानुवर्षी सत्ता भोगूनी त्यांना कोल्हापूरचा विकास साधता आला नाही. दरम्यान महायुती सरकारने कोल्हापूरच्या विकासाला प्रचंड गती दिली आहे सर्किट बेंच,  कन्व्हेन्शन सेंटर, अंबाबाई मंदिर विकास आराखडा,  रंकाळा संवर्धन ,  संगीतसूर्य  केशवराव भौसले नाट्यगृहाचे नूतनीकरण आणि शहरात पायाभूत सुविधा अशा विविध पातळीवर विकासाची कामे सुरू आहेत. जनतेने काँग्रेसला नाकारले आहे. ' असे क्षीरसागर म्हणाले
 जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांनी आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावरील खोटेनाटे आरोप खपवून घेतले जाणार नाही असा इशारा दिला. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आदिल फरास , ' राजेश क्षीरसागर हे लढवया कार्यकर्ते व धडाकेबाज आमदार आहेत.  गेली 40 वर्षे ते समाजकारण व राजकारणात आहेत. शहर विकासासाठी ते झटत आहेत. त्यांना बदनाम करण्याचे अनुषंगाने सोशल मीडियावर बनाव प्रसारित केला गेला आहे. मात्र असे प्रकार कोल्हापुरात चालत नाहीत. ' भारतीय जनता पक्षाचे महेश जाधव व महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी महायुती संपूर्णपणे आमदार राजेश क्षीरसागर यांच्या सोबत आहे आम्ही सारे एक्सेल दावत नेते मंडळी त्यांच्या पाठीशी आहेत असे स्पष्ट केले. उपमहापौर अक्षय झरक म्हणाले आमदार राजेश क्षीरसागर यांचे शहर विकासाचे काम वाखाण्याजोगे आहे जनसुराज्य शक्ती पक्ष त्यांच्या पाठीशी आहे. पत्रकार परिषदेला शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख विनायक साळोखे, नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर,  मंगल साळुंखे नगरसेवक अजय इंगवले,अभिजीत खतकर,  रत्नेश शिरोळकर, माजी नगरसेवक आनंदराव खेडकर, किरण नकाते, कमलाकर जगदाळे, रणजीत जाधव , सुनील जाधव, अनिल पाटील किशोर घाटगे, हर्षल सुर्वे तुकाराम साळोखे, अश्फाक आजरेकर,  पवित्रा रांगणेकर आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes