शनिवारी कोल्हापुरातील सेवाव्रतींचा सन्मान, पुस्तक प्रकाशन समारंभ !
schedule05 Mar 25 person by visibility 151 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या सेवाव्रतींचा सन्मान आणि त्यांच्या कार्यावर आधारित ‘गाथा सेवाव्रती कोल्हापूरकरांची’या पुस्तकाचे प्रकाशन असा संयुक्त समारंभ शनिवारी (आठ मार्च २०२५) होत आहे. दसरा चौक येथील शाहू स्मारक भवन येथे सायंकाळी ५.४५ मिनिटाला हा कार्यक्रम सुरू होणार आहे.
मराठी विश्वकोष निर्मिती मंडळाचे उपाध्यक्ष केशव उपाध्ये यांच्या हस्ते आणि माईर्स एमआयटी ग्रुपचे डॉ.महेश थोरवे यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ होणार आहे. याप्रसंगी शिक्षक विकास कुलकर्णी लिखित ‘गाथा सेवाव्रती कोल्हापूरकरांची’ पुस्तकाचे प्रकाशन आहे. यामध्ये त्यांनी विविध क्षेत्रात सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या व्यक्तींच्या कार्यावर प्रकाशझोत टाकला आहे.
कार्यक्रमात पुरस्कार प्राप्त विजेते शिक्षक सागर बगाडे, पद्माकर कापसे, राजू मेवेकरी, दीपक पोलादे, गीता हसूरकर, प्रशांत जोशी, उदय निंबाळकर, अरविंद देशपांडे, धनंजय नामजोशी, प्रमोद चव्हाण, अमोल बुड्डे, संजय ढेंगे, अमित प्रभा वसंत, शर्मिष्ठा ताशी, प्रभाकर मोळे, सुभाष पवार, गजानन मनगुतकर, प्रकाश गाताडे, ऐश्वर्या मुनिश्वर, रणजीत गोहिरे, शाम भागवत यांचा गौरव करण्यात येणार आहे. तसेच आबा देशपांडे, आनंदराव परांडेकर, बापूसाहेब राडे यांच्या कुटुंबीयांचा सत्कार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन संयोजक वाचनकट्टा संस्थेचे युवराज कदम, प्राचार्या रेखा निर्मळे यांनी केले आहे.