Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गोकुळतर्फे दूध खरेदी -विक्री दरात वाढ, २१ नोव्हेंबरपासून अंमलबजावणीवाढदिवसाला सामाजिक उपक्रमाची जोडसह्याद्रीच्या रक्षणासाठी जागरण यात्रा, पहिल्या टप्प्यात पारगड ते पन्हाळा यात्रा कॅननचे कोल्हापुरात अत्याधुनिक प्रॉडक्शन प्रिंटर्सचे प्रदर्शनजिप शाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी डॉक्टरांची मासिक भेट; स्पर्धा परीक्षा तयारीसाठी दर शनिवारी विशेष मार्गदर्शनडीवाय पाटील पॉलिटेक्निकचे यश कौतुकास्पद : ऋतुराज पाटीलएकल महिलांसाठी विशेष सर्वेक्षण; नगरसेविका मंगल साळोखे यांचा पुढाकारशिवाजी विद्यापीठातर्फे गुणवंत शिक्षक - प्रशासकीय सेवक पुरस्कारांची घोषणा, बुधवारी वितरण समारंभपंडित उल्हास कशाळकर, युवा पखवाजवादक कृष्णा साळुंखेंना गुणीदास पुरस्कार ! सहा डिसेंबरला वितरण समारंभ !!भलेबहाद्दर नगरसेवक....लक्ष्य गांधीनगरवर ! निशाणा प्रशासनावर !!

जाहिरात

 

गोकुळतर्फे दूध खरेदी -विक्री दरात वाढ, २१ नोव्हेंबरपासून अंमलबजावणी

schedule19 Nov 26 person by visibility 56 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) संघाशी संलग्न दूध उत्पादकांच्या कष्टाला योग्य मोबदला मिळावा, दुग्ध व्यवसायाला बळ मिळावे आणि दूध उत्पादन वाढीस प्रोत्साहन मिळावे, यासाठी संघाने म्हैस व गाय दूध खरेदी दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला. येत्या २१ नोव्हेंबर २०२६ पासून म्हैस दूध खरेदी दरात प्रतिलिटर ३ रुपये, तर गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर २ रुपये वाढ करण्यात आली आहे. म्हैस दूध खरेदी दरात करण्यात आलेली प्रति लिटर ३ रुपयाची वाढ ही गेल्या दहा वर्षातील सर्वाधिक दरवाढ आहे. या निर्णयामुळे संघाचे दूध संकलन वाढण्यास मदत होणार आहे. दरम्यान, गोकुळच्या म्हैस दुधाच्या विक्री दरात प्रतिलिटर ६ रुपयांची व गाय दुधाच्या विक्री दरात प्रतिलिटर ४ रुपयांची दरवाढ करण्यात आली आहे.

दूध खरेदी दरातील वाढीमुळे ६.० फॅट व ९.० एस.एन.एफ. गुणप्रतिच्या म्हैस दुधाचा खरेदी दर प्रतिलिटर ५५.०० रुपयांवरून ५८ रुपये, तर ३.५ फॅट व ८.५ एस.एन.एफ. गुणप्रतिच्या गाय दुधाचा खरेदी दर प्रतिलिटर ३७ रुपयांवरून ३९ रुपये करण्यात आला आहे. या दरवाढीमुळे गोकुळशी संलग्न दूध उत्पादकांना महिन्याकाठी सुमारे चौदा कोटी रुपयांची अतिरिक्त रक्कम मिळणार आहे. गोकुळ शिरगाव येथील गोकुळ दूध संघाच्या प्रधान कार्यालय येथे संघाच्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये हा दरवाढीचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.

संघाचे चेअरमन राजेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीला संचालक अभिजित तायशेटे, शशिकांत पाटील चुयेकर, चेतन नरके, अंबरिषसिंह घाटगे, अजित नरके, किसन चौगले, विरेंद्र मंडलिक, राहुल पाटील,  मदन देसाई, रणजितसिंह दि. पाटील, बाबासाहेब चौगले, रणजितसिंह कृ.पाटील, राहुल देसाई, विद्याधर गुरबे, अजित पाटील, कर्णसिंह गायकवाड, अमरसिंह पाटील, बाबासाहेब देवकर, विश्वजीत जाधव, राजूबाबा आवळे, शशिकांत खोत, बयाजी शेळके, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, भाग्यश्री डोंगळे, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले व संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

…………

‘सध्याची बाजारपेठेतील परिस्थिती, दूध व दुग्धजन्य पदार्थांची मागणी, कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमती, इंधन दरातील वाढ आणि एकूणच महागाईचा सर्वंकष विचार करून दूध उत्पादकांच्या हिताला प्राधान्य देत संचालक मंडळाने ही दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. दूध उत्पादकांचे हित आणि त्यांची आर्थिक उन्नती हेच गोकुळचे प्रमुख उद्दिष्ट असून, भविष्यात उद्भवणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी गोकुळ दूध संघ दूध उत्पादकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. सुधारित दूध खरेदी दराबाबतचे दरपत्रक लवकरच संघामार्फत प्राथमिक दूध संस्थांना देण्यात येणार आहे.’

-राजेश पाटील, चेअरमन गोकुळ दूध संघ

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes