Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गोकुळसाठी 18 ऑक्टोबरला मतदान, 19 ऑक्टोबरला मतमोजणीगोकुळच्या निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर होणारकल्पनेपासून उद्योगापर्यंत -नवउद्योजकांना उद्योगनिर्मितीची दिशाजिल्ह्यात चला शाळेत जाऊया अभियान, नोडल अधिकाऱ्याची नेमणूकजिप कर्मचारी सोसायटीतील अभ्यासिका - ग्रंथालयाचा लाभ घेऊन सभासदाच्या पाल्यांनी प्रशासकीय सेवेत करिअर करावेशिवसेना नगरसेवकांनी घेतली जिल्हा पोलीस प्रमुखांची भेट, कारवाई संदर्भात दिले निवेदनगोकुळच्या निवडणूक निर्णय अधिकारीपदी मोसमी चौगुलेएमपीएससी पेपरफुटीविरोधात कोल्हापुरात तरुणाई रस्त्यावरब्राह्मण सभा करवीर मंगलधामच्या अध्यक्षपदी विवेक शुक्ल, उपाध्यक्षपदी नंदकुमार मराठेताराराणी विद्यापीठात ‘आदर्श शिक्षक - गुणवंत सेवक’ पुरस्कारांचे उत्साहात वितरण

जाहिरात

 

स्टार्टअप उद्यमींसाठी आस्क मी एनीथिंग, केआयटीचा अभिनव उपक्रम

schedule30 Nov 25 person by visibility 559 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रातील नामांकित शिक्ष्ण संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केआयटीने आता स्टार्टअप सुरू करणाऱ्यांना त्यांच्या विविध टप्प्यांवर येणाऱ्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी तज्ञ मार्गदर्शनाची गरज ओळखून ‘आस्क मी एनीथिंग’ या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमात विविध संबंधित विषयांवर अनुभव असणाऱ्या तज्ज्ञांशी थेट चर्चा व प्रश्नोत्तरे करण्याची संधी मिळणार आहे. २२ नोव्हेंबर २०२५ ते ८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत एकूण सहा सत्रांचे आयोजन केले जाणार आहे.

स्टार्टअप केआयटी च्या इनोव्हेशन अँड रिसर्च फाउंडेशन च्या वतीने स्टार्टअप सुरू करणाऱ्या सर्वांसाठी अत्यंत उपयोगी व संवादात्मक अशा ‘आस्क मी एनीथिंग’ अशा शीर्षकाच्या व्याख्यानमालेचे उद्घाटन झाले. रजिस्ट्रेशन पासून शासकीय योजना, शासकीय नियमांची पूर्तता,पैसा उभारणी, मार्केट स्ट्रॅटेजी, बिजनेस मॉडेल, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग,अशा सर्व विषयांचा समावेश या विविध सहा सत्रांमधून करण्यात येणार आहे.

पहिल्या सत्राचे वक्ते होते कंपनी सचीव प्रदीप रासनकर यांनी स्टार्टअप ची नोंदणी, विविध विषयांची पूर्तता, टॅक्सेस, ऑडिट त्याचे फायदे याबाबत माहिती दिली. तसेच राज्य व केंद्र सरकारच्या स्टार्टअप विषयातील योजना सांगितल्या. या उपक्रमासाठी डॉ.मोहन वनरोट्टी, मुख्य अन्वेषक  निधी आयटीबीआय व संचालक केआयटी यांचे मार्गदर्शन या आयोजनासाठी लाभले. संस्थेचे अध्यक्ष साजिद हुदली, उपाध्यक्ष सचिन मेनन, सचिव दीपक चौगुले यांचे या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी प्रोत्साहन मिळाले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक केआयटी आयआरएफचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर आरळी यांनी केले. समीर पुनस्कर यांनी सूत्रसंचालन केले. देवेंद्र पाठक यांनी आभार मानले. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी ऋषिकेश दुधगावकर, संदीप लाड, पार्थ हजारे व विद्यार्थी प्रतिनिधी यांचे सहकार्य लाभले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes