Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापूरच्या समाजकारण - राजकारणातील आश्वासक चेहराशिक्षण समितीचा डिजीटल प्रयोग : एका तासात स्कॉलरशिप निकाल पालकांच्या मोबाईलवरपिंड कार्यकर्त्याचा, वृत्ती साऱ्यांना सोबत घेऊन काम करण्याचीकोल्हापूर महापालिकेच्या शाळेच्या विद्यार्थ्यांची इसरोकडे झेप विमान प्रवासासह अभ्यास सहलीचे आयोजनतीन पिढयांचे समाजकारण, लोकांच्यासोबत जुळलेली नाळ कायमसतेज पाटील अन् मी खाजगीत मित्र परंतु राजकीय शत्रूच – मंत्री हसन मुश्रीफगजानन महाराजनगरात घुमला महायुतीचा नारा ! सत्यजीत जाधव, माधुरी नकाते, यशोदा मोहितेंची प्रचारफेरी उत्साहातमदनमोहन लोहिया सांस्कृतिक मंचतर्फे संगीत महोत्सव ! राज्यस्तरीय भावगीत - नाट्यगीत गायन स्पर्धा !!महाविकास आघाडीचे उमेदवार सर्वसामान्यांसाठी काम करणारे - सतेज पाटीलथेट पाईपलाईन योजनेत तक्रारी होत्या, तर भाजपने आठ वर्षात चौकशी का केली नाही ? सतेज पाटलांचे खुले आव्हान

जाहिरात

 

प्रभागाच्या सेवेसाठी सूत्र अंगिकारुन काम करणारा लोकप्रतिनिधी

schedule05 Jan 26 person by visibility 35 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राजारामपुरी असो की ताराराणी विद्यापीठाचा परिसर, प्रत्येक ठिकाणी साऱ्यांच्या हक्काचा माणूस म्हणजे मुरलीधर जाधव. नगरसेवक पद हे प्रभागाच्या सेवेसाठी हे सूत्र अंगिकारुन काम करणारा हा लोकप्रतिनिधी. या पदाच्या माध्यमातून त्यांनी प्रभागात विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करताना लोकांचा विश्वास संपादन केला. त्याची फलश्रृती म्हणजे २००५ मधील निवडणुकीपासून सुरु झालेली त्यांच्या विजयाची परंपरा कायम आहे.
जानेवारी २०२६ मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीत ते भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत. प्रभाग क्रमांक सोळामधून कमळ चिन्हावर लढत आहेत. महापालिकेच्या निवडणुकीत विजयाची हॅट्‌ट्रिक करणारे मोजके नगरसेवक आहेत. त्यामध्ये मुरलीधर जाधव यांचा समावेश आहे. महापालिकेच्या तीन सभागृहात काम करताना मुरलीधर जाधव यांनी महत्वाच्या पदावर कामे केली. विरोधी पक्षनेता, स्थायी समिती सभापपतिपद भूषविले. माजी महापौर दीपक जाधव आणि मुरलीधर जाधव हे सख्खे भाऊ. या दोघां भावांनी महापालिकेत नगरसेवक म्हणून काम करताना प्रभागाच कायापालट केला. राजारामपुरी, तवन्नाप्पा पाटो हायस्कूल, ताराराणी विद्यापीठ प्रभाग, राजारामपुरी एक्स्टेंशन प्रभाग अशा वेगवेगळया ठिकाणाहून त्यांनी निवडणुका जिंकल्या. लोकांनी त्यांच्यावर सातत्याने विश्वास व्यक्त केला.
मुरलीधर जाधव यांनी २००५ मध्ये महापालिकेची निवडणूक पहिल्यांदा लढविली. ‘प्रभागातील लोकांची सेवा’हे ब्रीद अंगिकारुन काम केले. यामुळे प्रभाग कोणताही असो लोकांनी त्यांच्या गळयात विजयाची माळ घातली. २०१० ते २०१५ या सभागृहात काम करताना त्यांची स्थायी समिती सभापतिपदी काम करण्याची संधी मिळाली. २०१५ ते २०२० या कालावधीत त्यांनी नगरसेवक म्हणून प्रभावी कामगिरी केली.
प्रभागातील लोकांच्या सुखदुखात सहभागी होणारे हे व्यक्तिमत्व. कोरोना काळात त्यांनी लोकांना आरोग्य सुविधा मिळवून दिल्या. गरजू लोकांना अन्नधान्याचे कीट पुरविले. आरोग्य विभागातील कर्मचारी, पोलिस कर्मचारी, अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर वाटप केले. मास्क वितरित केले. त्यांनी कोरोनासारख्या आपत्तीच्या काळात लोकांसाठी केलेल्या कामाची दखल घेत ‘कोरोना योद्धा’ म्हणून त्यांचा सन्मान झाला आहे. नागरिकांच्या आशा आकांक्षा जाणून काम त्याच्या पूर्णत्वासाठी काम करणारा हा लोकप्रतिनधी. भाजपने त्यांना यंदा उमेदवारी दिली आहे. प्रभागातील प्रचारफेऱ्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. मतदारांच्या अपेक्षा जाणून प्रभागात त्या पद्धतीने काम करण्याचा त्यांचा मानस आहे.
 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes