प्राधिकरण परिपत्रकात दुरुस्ती हवी, महानगर प्रदेश विकास क्षेत्र प्राधिकरण स्थापन करा
schedule17 Mar 25 person by visibility 87 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणकडून अद्याप तरी कोल्हापूर शहर आणि आसपासच्या ४२ गावांचा विकास झाला नाही. यामुळे प्राधिकरण परिपत्रकात दुरुस्ती करुन कोल्हापूर महानगर प्रदेश विकास क्षेत्र प्राधिकरणची स्थापना करावी. महानगर प्रदेश विकास क्षेत्र प्राधिकरणसाठी आवश्यक दहा लाख लोकसंख्या व संलग्न २०० स्क्वेअर मीटर क्षेत्र या दोन अटी पूर्ण होतात. या निकषांची पूर्तता होत असल्यामुळे महानगर प्रदेश विकास क्षेत्र प्राधिकरण स्थापन केल्यास केंद्र व राज्य सरकार, वित्तीय कंपन्यांकडून विकासकामासाठी आवश्यक निधी मिळेल. यामुळे कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा प्रश्न निकालात निघेल. तेव्हा नागरी क्षेत्र प्राधिकरण परिपत्रकात दुरुस्ती करुन कोल्हापूर महानगर प्रदेश विकास क्षेत्र प्राधिकरण स्थापण्याबाबत प्रस्ताव मुख्यमंत्री कार्यालयाकडे सादर करावा या मागणीचे निवेदन एसफोरए विकास आघाडीचे राजू माने यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना दिले आहे. कोल्हापूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणमार्फत संपूर्ण जिल्हयाचा विकास होऊ शकतो. त्या अनुषंगाने प्रस्ताव सादर करावा. या कामी विलंब झाल्यास १४ एप्रिल २०२५ पासून दसरा चौक येथे आमरण उपोषण करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे.