Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
राजकारण्यांच्यापेक्षा लोकांसाठी झटणारी समाजरत्ने समाजासमोर झळकली पाहिजेत-प्रकाश आबिटकरमॅनेजमेंटसाठी पाच अर्ज वैध, भाटियांचा अर्ज अवैध ! हंगेरगीकरांच्या उमेदवारीला सुटाचा आक्षेप !कर्करोग उपचारांसाठी चुंबकीय नॅनो कणांच्या निर्मितीसाठी पेटंट ! सरकारने गरिबांच्या शिक्षणाचे दायित्व निभवावे- पुरोगामीचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटीलप्रा. दत्ता जाधव यांना पीएचडीराष्ट्रीय स्तरावरील हँडबॉल स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाची दमदार कामगिरीव्यवसाय परवाना दरवाढीला व्यावसायिकांचा विरोध ! महापालिका अन् चेंबर ऑफ कॉमर्स आमनेसामने !!बुधवारपासून चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धा, सर्वाधिक बक्षीसाची स्पर्धा शिवाजी विद्यापीठ मॅनेजमेंट कौन्सिलच्या दोन जागेसाठी सहा अर्जदूध विक्रीत गोकुळचा नवा रेकॉर्ड ! कर्मचाऱ्यांनी केला चेअरमनांचा सत्कार

जाहिरात

 

हद्दवाढीसाठी २३ मार्चला कोल्हापुरात सर्वपक्षीय धरणे आंदोलन

schedule17 Mar 25 person by visibility 89 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी पुन्हा एकदा सर्वपक्षीय कार्यकर्ते, विविध संस्था, संघटनांनी एकीची मूठ बांधली आहे. आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून २३ मार्च २०२५ रोजी कोल्हापुरात सर्वपक्षीय धरणे आंदोलन होणार आहे. छत्रपती शिवाजी चौक येथे आंदोलन करण्यात येणार आहे. कोल्हापूर शहर हद्दवाढ कृती व समन्वय समितीच्या बैठकीत आंदोलनाची घोषणा करण्यात आली. पुढील महिनाभरात सरकारने हद्दवाढीचा निर्णय घेतला नाही तर महापालिकेसमोर आमरण उपोषणाचा इशारा यावेळी देण्यात आला.

 हद्दवाढीच्या आंदोलनासंबंधी समितीचे निमंत्रक आर. के. पोवार यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी (१६ मार्च ) बैठक झाली. राजारामपुरीतील सुर्या हॉल येथे झालेल्या बैठकीत आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली. निमंत्रक पोवार म्हणाले, ‘हद्दवाढीसाठी आता निर्णायक लढयाची वेळ आहे. सरकारला आता चालढकल करुन चालणार नाही. हद्दवाढ करणार नसाल तर महापालिकेची नगरपालिका करा असे सरकारला सांगू.’ अॅड. बाबा इंदूलकर म्हणाले, ‘हद्दवाढीचा निर्णय हा सामज्यंसाने घ्यावा. सरकारने याविषयी निर्णय घ्यावा. अन्यथा महापालिकेसमोर उपोषण करू.’ राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी हद्दवाढीसंबंधी सुसंवादातून मार्ग काढण्याची सूचना केली.

माजी महापौर महादेवराव आडगुळे, राजू शिंगाडे, माजी नगरसेविका प्रार्थना समर्थ, पद्मा तिवले, भूपाल शेटे, मायादेवी भंडारे, विलास वास्कर, प्रतिज्ञा उत्तुरे, राजू जाधव यांनी हद्दवाढ आवश्यक असल्याचे सांगितले. क्रीडाईचे अध्यक्ष के. पी. खोत यांनी, ‘हद्दवाढीसंबंधी खासदार, आमदार व समितीच्या पदाधिकाऱ्यांची मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्यासोबत बैठक घ्यावी.’असे सुचविले.  चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांचेही भाषण झाले. नगरसेवक बाबा पार्टे यांनी प्रास्ताविक केले. बैठकीला माजी नगरसेवक अशोक भंडारे, अनिल कदम, रविकिरण इंगवले, राष्ट्रवादीचे अनिल घाटगे, महेश उत्तुरे, दिलीप देसाई, दुग्रेश लिंग्रस, शशिकांत पाटील, सुभाष देसाई,  फिरोज सरगूर, पद्मावती पाटील आदी उपस्थित होते.

………………………..

प्रा. जयंत पाटलांचा नेतेमंडळींना टोला

प्रा. जयंत पाटील यांनी हद्दवाढीवरुन नेतेमंडळीच्या भूमिकेवर बोट ठेवले. काही नेते मंडळी सत्तेत असताना एक व सत्तेबाहेर गेल्यानंतर दुसरे अशी भूमिका घेतात. सरकारने हा विषय त्वरित सोडविला पाहिजे. पालकमंत्री, खासदार, कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिणचे आमदार यांना एकत्रित करा. बैठक घेऊन निर्णय घ्यावा.’

……………………

क्षीरसागर हद्दवाढीसाठी प्रयत्नशील, इतर आमदारांचे तळयात-मळयात

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण म्हणाले, ‘हद्दवाढीसाठी आमदार राजेश क्षीरसागर हे पहिल्यापासून प्रयत्नशील आहेत. ते हद्दवाढ समर्थन समितीसोबत आहेत. इतर आमदार व नेते मंडळी याविषयी तळयात-मळयात असे दिसतात. संबंधितांनी भूमिका स्पष्ट करावी.’

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes