Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
बदलीसाठी खोटी प्रमाणपत्रे ! कागल-पन्हाळा-शिरोळ-राधानगरीतील शिक्षकांचा समावेश !!दिवाळीनंतर राष्ट्रवादीचे फटाके, नगरसेवकांसहा दहा जणांचा मंगळवारी मुंबईत पक्ष प्रवेशकहाणी जिद्दी मुलाची, सीए परीक्षेच्या यशाची ! अभिमानस्पद कामगिरी अन् भारावलेले आई-वडील !!कोल्हापूरच्या ३४ विद्यार्थ्यांचे सीए परीक्षेत यशअभिमान माळीचे सीए परीक्षेत यश, कोल्हापूर विभागात द्वितीय क्रमांक !भक्ती ईश्वराची-सेवा मानवाची या संकल्पनेनुसार वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत-डॉ. सतीश पत्कीटीईटी विरोधातील मोर्चात जिल्ह्यातील शंभर  टक्के शिक्षक सहभागी होणार- आमदार जयंत आसगांवकरकोल्हापूर शहरातील रस्ते दर्जेदार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही : आमदार राजेश क्षीरसागरकोरे अभियांत्रिकीत इंडस्ट्री रेडी इंजिनिअर प्रोग्रामकौस्तुभ गावडे यांच्या विजयासाठी जीवाचे रान करू - प्रचारप्रमुख श्रीराम साळुंखे

जाहिरात

 

दिवाळीनंतर राष्ट्रवादीचे फटाके, नगरसेवकांसहा दहा जणांचा मंगळवारी मुंबईत पक्ष प्रवेश

schedule03 Nov 25 person by visibility 201 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी अकरा नोव्हेंबरला आरक्षण सोडत निघत असताना दुसरीकडे कोल्हापुरात पक्षीय पातळीवर सक्षम उमेदवारांना पक्षात सामावून घेण्याच्या घडामोडी वेगावल्या आहेत. शिवसेनेपाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षानेही इनकमिंग सुरू झाले आहे. भारतीय जनता पक्ष, शिवसेनेसह ठाकरे गटाचे काही माजी नगरसेवक व सक्षम उमेदवार मिळून नऊ ते दहा जणांचा पक्ष प्रवेश मुंबई येथे मंगळवारी (४ नोव्हेंबर २०२५) होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये माजी नगरसेवक व अन्य मंडळीचा पक्ष प्रवेश होत आहे.

यामध्ये माजी नगरसेवक व शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमोल माने, माजी नगरसेवक नंदकुमार गुजर, माजी नगरसेवक कमलाकर भोपळे, माजी नगरसेवक प्रकाश काटे, माजी नगरसेवक नियाज खान यांचा पक्ष प्रवेश निश्चित मानला जात आहे. भोपळे हे भाजपशी निगडीत आहेत. अमोल माने हे २००५ ते २०१० या कालावधीत नगरसेवक होते. तर कमलाकर भोपळे हे २०१५ ते २०२० या कालावधीत नगरसेवक होते. टेंबलाईवाडी प्रभागातून ताराराणी आघाडी व भाजपकडून निवडून आले होते. सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत प्रयोदी फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा योगिता प्रविण कोडोलीकर या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. मुंबई येथे शक्तीप्रदर्शन करत कार्यकर्त्यांसह ही सारी मंडळी राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.  माजी नगरसेवक नियाज खाने हे २०१५ मध्ये शिवसेनेकडून निवडून आले होते. सध्या ते शिवसेना ठाकरे पक्षात होते. त्यांचा राष्ट्रवादीतील प्रवेश निश्वित आहे. आणखी चार दिवसांनी  त्यांचा कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे.

आगामी महापालिका निवडणुकीत कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक नंबरचा पक्ष असेल. महायुती म्हणून आम्ही निवडणूक  लढविणार आहोत. मातब्बर उमेदवार पक्षाच्या संपर्कात असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी काही दिवसापूर्वी म्हटले होते. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आदिल फरास व अन्य पदाधिकारी गेले काही दिवस सक्षम उमेदवारांचा शोध घेत होते. सध्या शहराध्यक्ष आदिल फरास यांच्यासह स्थायी समितीचे माजी सभापती व माजी नगरसेवक महेश सावंत, संदीप कवाळे, प्रकाश गवंडी यांच्यासह जवळपास दहा नगरसेवक राष्ट्रवादीत सक्रिय आहेत. महापालिका निवडणुकीत पक्षांकडून सक्षम उमेदवार रिंगणात उतरविण्यासाठी ही सारी मंडळी नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहेत. हे सारे जण मंगळवारी होणाऱ्या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमासाठी रात्री मुंबईकडे रवाना होत आहेत.  

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes