अभिमान माळीचे सीए परीक्षेत यश, कोल्हापूर विभागात द्वितीय क्रमांक !
schedule03 Nov 25 person by visibility 634 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौटंटस ऑफ इंडियातर्फे (आयसीएआय) घेण्यात आलेल्या सीए परीक्षेत येथील अभिमान गुरुबाळ माळी यांनी यश मिळवले. इन्स्टिट्यूटतर्फे सोमवारी, (तीन नोव्हेंबर २०२५) सीए परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला. सप्टेंबर २०२५ मध्ये परीक्षा झाली होती. या परीक्षेत अभिमानने ३८८ गुण मिळवले. तो, कोल्हापूर विभागात दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला. अभिमान हा कोल्हापुरातील ज्येष्ठ पत्रकार गुरुबाळ माळी यांचा मुलगा आहे. शालेय जीवनपासूनच हुशार विद्यार्थी म्हणून अभिमानची ओळख होती. त्याने, परीक्षेत ९८ टक्के तर बारावी परीक्षेत ९६ टक्के गुण मिळवले आहेत. बारावीनंतर फाऊंडेशनची परीक्षा देऊन त्याने चार्टर्ड अकौटंटसच्या अभ्यासक्रमाला सुरुवात केली. विशेष म्हणजे पहिल्याच प्रयत्नाने अभिमानने सीए अंतिम परीक्षेत यश मिळवले. त्याचे दहावी पर्यंतचे शिक्षण महावीर इंग्लिश स्कूल येथे झाले.