टीईटी विरोधातील मोर्चात जिल्ह्यातील शंभर टक्के शिक्षक सहभागी होणार- आमदार जयंत आसगांवकर
schedule02 Nov 25 person by visibility 229 category
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : टीईटी परीक्षेच्या अन्यायकारक निर्णयाविरोधात राज्य सरकारने पुनर्विचार याचिका दाखल करावी या व इतर मागणीसाठी सर्व शिक्षक संघटनांनी आठ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर पुकारलेल्या मूक मोर्चात कोल्हापूर जिल्ह्यातील शंभर टक्के शिक्षक सहभागी होतील असा विश्वास शिक्षक आमदार जयंत असगावकर यांनी व्यक्त केला.
मुख्याध्यापक संघ कोल्हापूर येथे झालेल्या शैक्षणिक व्यासपीठाच्या बैठकीत ते बोलत होते. मुख्याध्यापक संघाचे चेअरमन राहुल पोवार होते. आमदार असगावकर म्हणाले संघटनेने यापूर्वी चार ऑक्टोबर रोजी होणारा मूक मोर्चा शिक्षणमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी एक ऑक्टोबर रोजी नागपूर बैठकीत दिलेल्या आश्वासनानंतर स्थगित करण्यात आला होता. मात्र सरकारने शिक्षकांची फसवणूक केली असून अद्याप टी ई टी विरोधात सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली नाही व टी ई टी संदर्भात शिक्षकांच्या बाजूने कोणतीही भूमिका जाहीर न केल्याने राज्यातील शिक्षक वर्गामध्ये तीव्र नाराजी आहे.
या पार्श्वभूमीवर आता राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघटनांनी एकत्र येऊन आठ नोव्हेंबर रोजी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर मूक मोर्चाचे आयोजन केले आहे. या बैठकीत शिक्षक नेते राजाराम वरुटे, भरत रसाळे, प्रसाद पाटील, सुधाकर सावंत, संभाजी बापट यांनी मनोगत व्यक्त केले. बैठकीस एस के पाटील, बबन केकरे, सर्जेराव सुतार, बाबाबासाहेब पाटील, टी. आर. पाटील, दिलीप माने, काकासाहेब भोकरे, सतीश लोहार, मनोहर जाधव, बाजीराव कांबळे, संजय गांगण, दिपक जगदाळे उपास्थित होते.
…………………………
दसरा चौकातून मोर्चाला सुरुवात
मोर्चाची सुरुवात दसरा चौक येथून दुपारी एक वाजता होणार आहे. मोर्चा दसरा चौक - व्हिनस कॉर्नर - जिल्हाधिकारी कार्यालय येथे सांगता होईल. तरी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांनी उपस्थित रहावे असे आवाहन मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष राहुल पोवार यांनी केले.