Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
शहर स्वच्छतेच्या कामकाजात कसूर झाल्यास आरोग्य निरीक्षक - मुकादमांवर कारवाई ! आयुक्त करणार पहाटेही तपासणी ! !जिपच्या स्थायी सभेत ग्रामीण प्रश्नांना वाचा, गारगोटीतील पाणी योजनेचे काम संथगतीने !गैरहजर अधिकाऱ्याना नोटिस !!गोकुळची निवडणूक तात्काळ सुरू करून महायुती म्हणूनच लढण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश- नविद मुश्रीफ यांची माहिती कोरोनाशी भिडताना हे पुस्तक एका संकटाचा दस्ताऐवज नसून मानवी जिद्दीची गाथा - मंत्री हसन मुश्रीफरूट ३२ मुक्तहास्य स्पर्धा, विजेत्यांना लाख रुपयांची बक्षीसेकोल्हापुरात तीस एप्रिलपासून एक दिवसआड पाणी पुरवठामहाराष्ट्र जैन साहित्य परिषदेचे पुरस्कार जाहीर ! वसंत भोसले, महावीर अक्कोळे, निलम माणगावेंचा समावेश ! !रग्गेडियन फिटनेस क्लब - कोरगावकर ग्रुपतर्फे मोफत आरोग्य तपासणी कागदावरच्या बोगस दूध संस्था रद्द करा, अन्यथा त्यांच्याच सात पिढ्या गोकुळवर राज्य करतीलभाजपच महिला आरक्षणाच्या विरोधात, लोकांची दिशाभूल करण्यासाठी आता मोर्चोचे सोंग - आमदार विश्वजीत कदम

जाहिरात

 

जिपच्या स्थायी सभेत ग्रामीण प्रश्नांना वाचा, गारगोटीतील पाणी योजनेचे काम संथगतीने !गैरहजर अधिकाऱ्याना नोटिस !!

schedule29 Apr 26 person by visibility 84 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेची निवडणुक होऊन पदाधिकारी यांची निवड प्रक्रिया पार पडल्यानंतर प्रथमच व जवळ जवळ चार वर्षानंतर अधिकारी व पदाधिकारी यांची संयुक्त स्थायी समिती सभा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिल्पा शशिकांत खोत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेत सदस्यांनी, ग्रामीण भागातील जिव्हाळयांच्या प्रश्नांना वाचा फोडली. सदस्यांच्या प्रश्नाच्या अनुषंगाने तत्काळ कार्यवाही करावी अशा सूचना अध्यक्षांनी केल्या. करुन सर्व स्थायी समिती सदस्यांना लेखी स्वरुपात उत्तरे देण्याच्या सुचना दिल्या.

सदस्य अमर पाटील यांनी,  जिल्हा परिषदेकडील प्राप्त निधी अखर्चित राहुन परत जाणार नाही याची दक्षता घ्यावी अशी सूचना केली. सदस्य अभिजीत तायशेटे , संग्रामसिंह कुपेकर यांनी,  वनक्षेत्रामध्ये अनेक गावांतील शासकीय जमीनींचे मोठया प्रमाणावर अतिक्रमण झाले आहे. एक जानेवारी २०११ पुर्वीचे अतिक्रमणे नियमित करणेबाबत कार्यवाहीचा मुद्दा मांडला. तसेच प्रशासनाकडून पुढील स्थायी समिती सभेवेळी वन विभाग व महसुल विभागाच्या अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्यासंबंधी प्रशासनाला सूचना कली. सदस्य सुधीर देसाई यांनी, ग्रामीण भागात खंताची टंचाई निर्माण झाली असून त्यावर तात्काळ उपाय योजना करावी.आजरा घनसाळच्या उत्पादन वाढीसाठी नियोजन करावे असे सांगितले. सदस्य अमरसिंह पाटील यांनी, शेतकऱ्यांना बी-बियाणे पेरणीपूर्वी पुरविणेची व्यवस्था करणेबाबतच्या सूचना केली.

 ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत पाणी टंचाईचा पुरवणी आराखडा तयार करणेत यावा. जी गावे टंचाईग्रस्त आहेत पण आराखडयामध्ये त्यांचा समावेश नाही अशा गावांची यादी सदस्यांकडून घेऊन त्याचा समावेश पुरवणी आराखड्यामध्ये करावा अशा सूचना उपाध्यक्ष तानाजी पाटील यांनी केली. सदस्य महेश पाटील यांनी, जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हयामध्ये चालू असलेल्या पाणी पुरवठा योजनांचे अंदाजपत्रक गावांची गरज लक्षात न घेता पाच कोटीच्या मर्यादेत करण्यास संबंधित अधिकारी यांनी भाग पाडले. कारण पाच कोटीच्या वर अंदाजपत्रक गेल्यास महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे हस्तारीत होते हे निदर्शनास आणले. शिवाय तळंदगे नळ पाणी पुरवठा योजना बंद पडल्याचे निदर्शनास आणले.

 सदस्या रेश्मा राहुल देसाई यांनी, गारगोटी पाणी पुरवठा योजनेचे काम संथ गतीने सुरु आहे तरी हे काम गतीमानतेने पूर्ण करावे अशी सूचना केली. सदस्य जयंत पाटील यांनी, बोरपाडळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम अनेक दिवस अपूर्ण अवस्थेत असल्याचे सांगितले. तर रेंदाळ उपकेंद्र प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रुपांतर करणेबाबतचा प्रस्ताव तात्काळ सादर कराा अशी सूचना शिवाजी मुरलीधर जाधव यांनी केली. दरम्यान या बैठकीला काही खातेप्रमुख गैरहजर होते, त्याची गंभीर दखल घेत अध्यक्ष खोत यांनी, स्थायी समितीसाठी जे अधिकारी अनुपस्थित आहेत त्यांना पत्र देऊन विचारणा करावी असे सांगितले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांनी प्रशासनाकडून बाजू मांडली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes