Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कुलगुरू भेटीला, साहित्यिक भारावलेआयटीआयमध्ये रोजगार मेळावा, तीस जणांची निवडहरित शिरोलीसाठी कारखानदार सरसावले, स्मॅक भवन परिसरात १२५ देशी वृक्षांचे रोपणस्वप्नांना आकार देणारे करिअर म्हणजे वास्तुकला – डॉ. ए. के. गुप्ता अध्यक्ष, सीईओ, सभापतींची शाळेपर्यत धाव ! विद्यार्थिनींच्या प्रकृतीची घेतली माहिती ! !कोल्हापूरच्या आयटी क्षेत्राला जागतिक भरारीचे पंख! कोल्हापुरातील आयटी कंपन्या करणार अमेरिकेला सॉफ्टवेअरसह इतर सेवा निर्यात ! !सूरज साखरेवरील गोळीबार प्रकरणी दोन आरोपींना अटकपृथ्वी अजित मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिरकृषी पदव्युत्तर प्रवेश परीक्षेत डीवाय पाटील कृषीचे विद्यार्थी राज्यात प्रथमदक्षिण भारत जैन सभेचे १०४ वे नैमित्तिक अधिवेशन २ ऑगस्टला कोल्हापुरात

जाहिरात

 

स्वप्नांना आकार देणारे करिअर म्हणजे वास्तुकला – डॉ. ए. के. गुप्ता

schedule18 Jul 26 person by visibility 14 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर आर्कीटेक्चर अर्थात वास्तुकला  हे विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला दिशा देत समाजाच्या विकासात मोलाचे योगदान देणारे आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने भविष्य घडविणारे करिअर आहेहे क्षेत्र केवळ इमारतींची रचना करण्यापुरते मर्यादित नसून सर्जनशीलता, पर्यावरणपूरक विचार, संशोधन आणि नावीन्यपूर्ण कल्पनांना आकार देणारे क्षेत्र असल्याचे प्रतिपादन डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. . के. गुप्ता यांनी केले.

डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, कसबा बावडा येथील स्कूल ऑफ आर्किटेक्चरतर्फे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या बी.आर्क. प्रवेश प्रक्रियेबाबत विद्यार्थी पालकांसाठी आयोजित मार्गदर्शन परिसंवादात ते बोलत होते. बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थी, पालक तसेच वास्तुकला क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचा परिसंवादाला  प्रतिसाद लाभला.

परिसंवादात बी.आर्क. प्रवेशासाठी आवश्यक पात्रता, नाटा जेईई पेपर परीक्षा, केंद्रीय प्रवेश प्रक्रिया २०२६-२७ मधील महत्त्वाचे बदल, शिष्यवृत्ती, आरक्षण, आवश्यक कागदपत्रे, प्रवेश क्षमता, सीट वितरण तसेच प्रवेश प्रक्रियेविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी स्कूल ऑफ आर्किटेक्चरमधील एआय, बीआयएम, डिजिटल ट्वीन, पॅरामेट्रीक डिझाईन, स्मार्ट सिटीज, डी प्रिंटींग यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित अध्यापन, सुसज्ज स्टुडिओ प्रयोगशाळा, उद्योगाभिमुख प्रशिक्षण, इंटर्नशिप, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील संधी तसेच विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर पटकाविलेल्या नासा आर्की. लुईस आय कान ट्रॉफी बद्दल माहिती दिली. स्कूल ऑफ आर्किटेक्चरचे प्रमुख प्रा. इंद्रजीत जाधव यांनी शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली. यावेळी प्राचार्य डॉ. एस. डी. चेडे, रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे, अधिष्ठाता डॉ. राहुल पाटील, प्रवेश प्रक्रिया प्रमुख प्रा. रवींद्र बेन्नी, प्रवेश समन्वयक मंजित जाधव तिलोत्तमा पाडळे उपस्थित होतेसंस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांचे प्रोत्साहन लाभले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes