Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
सूरज साखरेवरील गोळीबार प्रकरणी दोन आरोपींना अटकपृथ्वी अजित मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिरकृषी पदव्युत्तर प्रवेश परीक्षेत डीवाय पाटील कृषीचे विद्यार्थी राज्यात प्रथमदक्षिण भारत जैन सभेचे १०४ वे नैमित्तिक अधिवेशन २ ऑगस्टला कोल्हापुरातज्येष्ठ विधीज्ञ ॲड. नीला सोनटक्के यांचे निधनशक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात शनिवारी पंढरपूरमध्ये सद्बुद्धी दिंडी यात्रा , बाधित शेतकऱ्यांची होणार सभा हॉटेल मालक संघाच्या अध्यक्षपदी सचिन शानभाग, उपाध्यक्षपदी अरुण भोसलेसर्किट बेंचच्या अंतर्गत तक्रार समितीची स्थापना ! अध्यक्षपदी न्यायमूर्ती वृषाली जोशी, समिती सदस्यपदी आठ जण ! !शिरोलीत पोलिसांची कारवाई, ग्रामपंचायत सदस्यासह सहा जण वर्षभरासाठी हद्दपार महापालिका स्तरावरील सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत महाराष्ट्र हायस्कूलचे वर्चस्व

जाहिरात

 

कृषी पदव्युत्तर प्रवेश परीक्षेत डीवाय पाटील कृषीचे विद्यार्थी राज्यात प्रथम

schedule17 Jul 26 person by visibility 10 categoryशैक्षणिक

 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषद, पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या पदव्युत्तर पदवी सामयिक प्रवेश पात्रता परीक्षेत  तळसंदे येथील डॉ. डी. वाय. पाटील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय (बी. टेक ॲग्री.) आणि डॉ. डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालय (बी. एस्सी ॲग्री.) च्या विद्यार्थ्यांनी राज्यात अव्वल स्थान मिळवले  आहे. संस्थेचे विश्वस्त ऋतुराज पाटील यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. 

या परीक्षेत बी. टेक ॲग्रीच्या दीपक समाधान शिंदे याने राज्यात प्रथम क्रमांक मिळवला. तर  दिक्षा मगदूम (५), युवराज परीट (११),  प्रणव पाटील (१५), कुणाल ठावरे (१६), वरुण पाटील (१७),  विशाल चव्हाण (३०), अभिषेक भुसाळ (३३), सोहम  मांडे (३६) आणि संतोष हुलवान (३६) यांनीही राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळवले.

बी. एस्सी ॲग्री. ची विद्यार्थीनी कु. प्रज्ञा मानसिंग भोसले हिनेही महाराष्ट्रात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. याशिवाय अमेय बारटक्के (३), श्रद्धा पाटील (८), ऋतुजा मोरे (१४), जयदत्त पठाडे (१६) आणि धीरज पाटील (१८) यांनी राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे. या यादीत पहिल्या ५० गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये महाविद्यालयाच्या एकूण २० विद्यार्थ्यांनी स्थान मिळवले आहे.

विश्वस्त ऋतुराज पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश संपूर्ण संस्थेसाठी अभिमानास्पद आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण, आधुनिक तंत्रज्ञान आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शन यामुळे ही यश मिळाले आहे.  विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सक्षम करण्यासाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. 

कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता म्हणाले, दोन्ही
महाविद्यालयांनी राबविलेली नियमित मार्गदर्शन सत्रे, तज्ज्ञ प्राध्यापकांचे वैयक्तिक मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षा सराव चाचण्या याचा चांगला फायदा विद्यार्थ्यांना झाला.यावेळी उपप्राचार्य पी.डी. उके, प्रा. अमोल गाताडे, प्रा. आर. आर. पाटील यांच्यासह विभागप्रमुख, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.संस्थेचे अध्यक्ष डॉ संजय डी पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांनी  विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes